विशाळगडाच्या नावाचे रहस्य

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 15 April 2020

विशाळगडाची उभारणी इ.स. १०५८ मध्ये शिलाहार राजा मारसिंह यांनी केली. हा गड किल्ले खेळणा या नावाने देखील ओळखला जातो.

विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस ७६ कि.मी. अंतरावर वसलेला आहे. सह्याद्री पर्वतरांग आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर किल्ले विशाळगड उभा आहे. विशाळगड इ.स. १०५८ मध्ये बांधला गेला आहे.

विशाळगडाची उभारणी इ.स. १०५८ मध्ये शिलाहार राजा मारसिंह यांनी केली. हा गड किल्ले खेळणा या नावाने देखील ओळखला जातो. साधारण इ.स. १४५० च्या सुमारास बहमणी राज्याचा एक सुभेदार हा प्रांत काबीज करण्यासाठी आला. हा सरदार म्हणजे मलीक उत्तुजार होय त्याने प्रथम पन्हाळ्या किल्ल्यावरील शिकर्यांना जेरीस आणले.

शिकर्यांनी मलीक उत्तुजाराला विशाळगडाचे आमिष दाखवले. शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली मलीक उत्तुजारची सात हजाराची फौज विशाळगडाच्या निबिड अरण्यात येऊन दाखल झाली. अतिशय अडचणीच्या जागेवर सैन्यासकट मलीक उत्तुजारला आणल्यावर विशाळगडावरील शंकरराव मोरे यांनी जोरदार हल्ला केला. शिर्के आणि मोरे यांनी कात्रीत सापडलेल्या मलीक उत्तुजारला सात हजार सैन्यासकट यांच्या आक्रमणापासून मुत्त्क केला. त्याचीच कबर विशाळगडावर आहे असे जाणकारांचे मत आहे. 

पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६५९ मध्ये हा किल्ला जिंकला आणि त्याचे नामकरण केले विशाळगड ! विशाळगड हा मराठ्यांच्या देदीप्यमान इतिहासातील एका अचाट पराक्रमाचा साक्षीदार आहे आणि तो म्हणजे महाराजांनी आदिलशाही सरदार सिद्दी जौहार यांने टाकलेल्या पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका !

आणि यासाठी अवघे 300 मावळे घेऊन आठ तासांहूनी अधिक काळ हजारोंच्या फौजेला गजापूरच्या खिंडीत थोपवून धरणारे वीररत्न बाजीप्रभु देशपांडे यांच्या अव्दितीय पराक्रमाचा ! पुढे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजीराजांनी विशाळगडावर बराचसा काळ व्यतीत केला. त्यांनी या किल्ल्याची डागडुजी तसेच पुनर्बांधणीकडे विशेष लक्ष दिले. 

कोल्हापूरच्या छत्रपतींचे पंतप्रधान पंत प्रतिनिधी हे विशाळगड येथे राहत असून ते विशाळगडाचे जहागीरदार होते. त्यानंतर ते मलकापूर येथे रहावयास गेले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News