‘हे’ आहे भास्करगडाच रहस्य

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 2 April 2020
गड वसलेले आहेत तर दुसर्‍या टप्प्यात ब्रम्हगिरी अजनेरी हे किल्ले येतात. प्राचिनकाळी नालासोपारा, डहाणू, वसई इत्यादी बंदरात उतरणारा माल वेगवेगळ्या घाटमार्गांनी नाशिक या शहराकडे जात असे यापैकी गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी ‘बसगड’ किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती.

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे आणि इगतपूरीच्या उत्तरेस एक डोंगररांग पसरलेली आहे त्यास त्र्यंबक रांग असेही म्हणतात ही रांग दोन भागात विभागली गेली आहे पहिल्या टप्प्यात बसगड, हरिहर हे गड वसलेले आहेत तर दुसर्‍या टप्प्यात ब्रम्हगिरी अजनेरी हे किल्ले येतात. प्राचिनकाळी नालासोपारा, डहाणू, वसई इत्यादी बंदरात उतरणारा माल वेगवेगळ्या घाटमार्गांनी नाशिक या शहराकडे जात असे यापैकी गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी ‘बसगड’ किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती.

इ.स १२७१ ते १३०८ पर्यंत हा किल्ला देवगिरीच्या अधिपत्याखाली होता नंतर बहामनी पुढे निजामशाही यांच्याकडे किल्ला होता निजामशाहीच्या अंतकाळात इ.स १६२९ मध्ये शहाजीराजांनी बंड केले तेव्हा भास्करगड त्यांच्या ताब्यात गेला. १६३३ मध्ये शहाजीराजांकडून हा किल्ला मोगलांकडे गेला १६७० मध्ये शिवरायांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने हा किल्ला जिंकून घेतला १६८८ मध्ये मोगलांनी भास्करगड जिंकून घेतला इ.स १७३० मध्ये कोळ्यांनी बंड करुन तो घेतला पूढे १८१८ पर्यंत हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता.

भास्करगडचा माथा बेसॉल्ट खडकाचा बनलेला आहे. किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे काताळात खोदून काढलेला सर्पिलाकार जिना असमान उंचीच्या पायर्‍या असलेल्या या जिन्याच्या दोन्ही बाजूला १० फूट उंचीच्या कातळभिंती आहेत जिन्याचा मार्ग आपल्याला पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारासमोर घेऊन जातो प्रवेशद्वार कमानीच्या महिरपीपर्यंत मातीत गाडल गेलेला होता. (गडवाट परिवारातर्फे किल्ल्यावरील प्रवेशद्वार श्रमदान मोहीम मागील वर्षी जून महिन्यात राबविण्यात आली.) प्रवेशद्वारातून किल्ल्यात शिरल्यावर समोर आणि उजव्या बाजूला अशा दोन वाटा फूटतात या दोनही वाटा किल्ल्याच्या पठारावर जातात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News