कोरियाच्या मुलींच्या सौंदर्या मागील रहस्य

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Wednesday, 29 January 2020
  • कोरिया देशातील मुली सौंदर्याच्या बाबतीत खूप सुंदर आहेत. रोज येथील महिला काही नियम पाळतात, त्या नियमांमुळे त्वचेचा ग्लो वाढू लागतो.
  • इथल्या मुलींचे नैसर्गिक सौंदर्य इतके आहे की बाकीच्या देशांच्या तुलनेत इथल्या सुंदर मुली पाहणे सहज शक्य नाही.

कोरिया देशातील मुली सौंदर्याच्या बाबतीत खूप सुंदर आहेत. रोज येथील महिला काही नियम पाळतात, त्या नियमांमुळे त्वचेचा ग्लो वाढू लागतो. इथल्या मुलींचे नैसर्गिक सौंदर्य इतके आहे की बाकीच्या देशांच्या तुलनेत इथल्या सुंदर मुली पाहणे सहज शक्य नाही. कोरियाच्या मूलींच्या सौंदर्याचे रहस्य तूम्हाला आम्ही सांगणार आहोत. जर त्यांच्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही सुध्दा तुमच्या चेहऱ्याचा ग्लो आणि सौंदर्य वाढवू शकतात.  

हॉट टॉवेल मसाज

हॉट टॉवेल मसाज मध्ये सर्वात प्रथम गरम टॉवेलने चेहरा झाकलेला असतो. त्यानंतर, त्यांच टॉवेलवरून चेहऱ्याची मालिश केली जाते. त्यानंतर टॉवेल 15 मिनिटांनी काढला जातो. त्यामुळे चेहऱ्यावरील रक्तभिसरण सुध्दा वाढण्यास मदत होते आणि चेहऱ्यावर ग्लो देखील येतो.   

मेन शेविंग फॉर्मचा वापर

मेन शेविंग फॉर्मचा वापर चेहऱ्यावरील मुरूम काढून टाकण्यासाठी केला जातो. त्यानंतर चेहरा 5 ते 10 मिनिटांनी स्वच्छ केला जातो. ही प्रक्रिया आठवड्यातून एक किंवा दोन वेळा केली जाते. 

सॉल्ट टॉनिकचा वापर

सॉल्ट टॉनिकचा वापर करण्यासाठी, एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात एक चमचा मीठ मिसळून चेहरा स्वच्छ केल्यानंतर या पाण्याने पुन्हा एकदा चेहरा स्वच्छ केला जातो. पण ज्या लोकांची त्वचा डैमेज असेल त्यांनी यांचा वापर करू नये.  

लिंबाच्या रसाचा वापर

लिंबाच्या रसाचा वापर हा फक्त कोरियन मुलींचा चेहरा स्वच्छ करण्यासाठी नव्हे तर संपूर्ण शरीर स्वच्छ करण्यासाठी सुध्दा वापर केला जातो. तसेच, शरीर निरोगी राहण्यास लिंबाच्या रसाचा वाप मोठ्या प्रमाणात केला जातो. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News