सह्याद्रीची मुख्य रांग महाराष्ट्रामध्ये दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेत स्वराज्यातील सर्वात दक्षिणे टोकाला हा किल्ला येतो म्हणनूच याचे नाव पारगड ठेवण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामध्ये पारगड हा किल्ला मोडतो. चंदगड तालुक्याच्या गावापासून पारगडाचे अंतर साधारण ३० कि.मी. आहे. किल्ल्यामध्येच पारगड नावाचे गाव वसलेले आहे. पारगडापर्यंत गाडीमार्ग असून चंगदगडहून गडाच्या पायऱ्यांपर्यंत एस.टी.बसची सोय उपलब्ध आहे. खाजगी वाहन गडाला वळसा घालून गडाच्या माथ्यावर नेता येते. सुमारेतीनशे पायऱ्या चढून जाव्या लागतात. यात नव्याने केलेल्या पायऱ्यांबरोबर शिवकालीन पायऱ्याही आपल्याला आढळतात.
इतिहाससिंहगड किल्ला माघ वद्य नवमी इ.स. १६७१ मध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांनी जिंकला. या वेळी झालेल्या युध्दात तानाजींना मृत्यू पत्करावा लागला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी पारगड किल्ला बांधला आणि त्याची जबाबदारी किल्लेदार म्हणून तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे यांच्याकडे सोपवली.
सन १६७६ मध्ये काही काळ महाराजांनी या गडावर मुक्काम केला होता. सन १६७६ मध्ये पोर्तुगीजवरील स्वारीवरून परत येताना शिवरायांनी ह्या पारगड डोंगराचे भौगोलिक स्थान आणि महत्त्व ओळखले आणि पोर्तुगीज, अदिलशहा आणि सावंकवाडीचे खेम सावंत यांच्यावर कायमची जरब बसविण्यासाठी हा किल्ला वसविला. शिवाजी महाराजांच्या उपस्थितीत किल्ल्याची वास्तुशांत आणि गडप्रवेश झाला. त्यावेळी किल्लेदार रायबा मालुसरे आणि त्यांच्या ५०० सहकार्यांना राजांनी आज्ञा केली की, चंद्र सुर्य असेतो, गड जागता ठेवाराजांच्या अद्याप पर्यंत केले आहे.
स्वराज्यातील पार टोकाचा किल्ला म्हणून याचे नाव पारगड ठेवण्यात आले. पारगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांचे ११ वे वंशज बालकृष्ण मालुसरे, शेलार मामांचे वंशज, कान्होबा माळवे इत्यादी वास्तव्यास आहेत. बाळकृष्ण मालुसरे व्यावसायानिमित्त अनगोळ, बेळगावाला असतात. त्यांच्याकडे तानाजी मालुसरे यांची तलवार आणि शिवरायांच्या गळ्यातील सामुद्री कवड्यांची माळ जतन केलेली आहे.
अशा फक्त ५ माळा महाराष्ट्रात उपलब्ध असूव, त्या सातारच्या राजवाड्यात, प्रतापगडावरील भवानीच्या गळ्यात, कोल्हापूर महालक्ष्मीच्या गळ्यात आणि तुळजापूरच्या भवानीच्या गळ्यात आहेत. माघी महिन्यातील उत्सवात आणि दसऱ्याच्या उत्सवात गडावरील मावळे आपल्या पूर्वजांची शस्त्रास्त्रे प्रदर्शित करतात. नंतरच्या काळात इ.स. १६८९ मध्ये औरंगजेबाचा मुलगा मुअज्जम याने पारगड जिंकण्याचा प्रयत्न केला पण त्याला या मावळ्यांनी दाद लागू दिली नाही. गडावरील पहाण्यासारखी ठिकाणेगडाचा दरवाजा नष्ट झालेला आहे.
गडप्रवेश करताच समोर तुटक्या तोफांचे काही तुकडे मांडले दिसतात. मंदिरासमोर अनामिक असे स्मारक आहे. हे घडीव दगडामध्ये बांधलेले स्मारक कोणातरी महत्त्वाच्या व्यक्तीचे असावे. येथून थोडे वर चढल्यावर पारगडावरील वस्ती लागते. शाळेच्या आवारातच छत्रपती शिवाजी महराजांचा छोटासा पण पुर्णाकृती पुतळा चौथर्यावर बसविलेला आहे.
या पुतळाच्या परिसरातच पूर्वी गडावरची सदर होती. येथून समोरच आपल्याला भवानीमातेचे मंदिर दिसते. या मंदिराचा कायापालटच करण्यात आला आहे. शिवकालीन मंदिर तसेच ठेवून त्याभोवती नविन इमारत उभी करण्यात आली आहे. बांधलेले मंदिर भव्य असून नव्याने शिखर आणि सभामंडप बांधण्यात आला आहे. मंदिरात भावनीमातेची देखणी मुर्ती आहे. मंदिराच्या सभामंडपात शिवकालीन अनेक प्रसंग चितारलेली चित्रे लावली आहेत. गडावर अनेक तलाव, विहीरी, तटबंदी, स्मारके पहाता येतात.