लाख रुपयांची नोकरी सोडून पंक्चर काढणाऱ्याचा मुलगा बनला दुसऱ्यांदा आमदार

यिनबझ टीम
Thursday, 13 February 2020

दिल्लीत आम आदमी पार्टी मोठ्या बहुमताने जिंकून सरकार स्थापन करण्याची तयारी करत आहे. आम आदमी पक्षाने 70 पैकी 62 जागा जिंकल्या आहेत. जंगपुरा येथील आपचे उमेदवार प्रवीण कुमार हेदेखील या विजयाचा एक भाग बनले आहेत.

दिल्ली - दिल्लीत आम आदमी पार्टी मोठ्या बहुमताने जिंकून सरकार स्थापन करण्याची तयारी करत आहे. आम आदमी पक्षाने 70 पैकी 62 जागा जिंकल्या आहेत. जंगपुरा येथील आपचे उमेदवार प्रवीण कुमार हेदेखील या विजयाचा एक भाग बनले आहेत.

एमबीए करून दिल्लीत नोकरीच्या शोधात आलेल्या प्रवीण कुमार यांनी आपला लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी सोडून केजरीवाल यांच्या चळवळीचा एक भाग बनले. आता दुसऱ्यांदा आमदार बनून त्यांनी हे सिद्ध केले आहे की एखाद्या गोष्टीची आवड असेल तर आपण त्याच्यासाठी काहीही करू शकतो.

35 वर्षीय प्रविण देशमुख मध्य प्रदेशातल्या बैतूल तालुक्यातल्या आठनेर गावाचा रहिवाशी आहे. त्यांचे वडील भोपाळमध्ये गाडीचे टायर रिमोल्ड आणि पंक्चर काढण्याचे काम करतात. आपला मुलगा जरी दुसऱ्यांदा आमदार झाला असेल, तरी वडीलांनी आपला व्यवसाय कधीच सोडला नाही.

प्रवीण कुमार यांचं लहानपण संपूर्ण संघर्षातून गेल्याचे म्हटले जाते. शेतकऱ्याच्या कुटुंबातून येणारे प्रविण लहानपणापासूनच अत्यंत प्रभावशाली असल्याची माहिती त्यांच्या प्राथमिक शिक्षकांनी दिली. प्राथमिक शिक्षण पुर्ण झाल्यानंतर प्रविण भोपाळच्या टीआयटी कॉलेजमध्ये बीएससीचे शिक्षण घेतले.

आपल्या मुलाचे शिक्षण थांबू नये म्हणून वडील पंढरीनाथ देशमुख हेदेखील भोपाळला आले. इथे टायरचे पंक्चर काढून आणि टायर रिमोल्ड करत प्रविण यांना सर्वोत्तम शिक्षण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्यालाच साथ देत प्रविण यांनी एमबीएचे शिक्षण पूर्ण केले.

शिक्षण पुर्ण केल्यानंतर प्रविण यांना दिल्लीच्या एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये 50 हजार रुपयांची नोकरी मिळाली, मात्र अण्णा हजारे यांचे त्यावेळी जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला प्रभावित होऊन प्रविण यांनी आपली नोकरी सोडून पुर्णवेळ आण्णा हजारे यांना पाठिंबा द्यायचं ठरवले.

आंदोलन संपल्यानंतर प्रविण यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. आपच्या पहिल्या सरकारच्यावेळी दिल्लीत असलेल्या शिक्षण मंत्री मनीष ससोदिया यांचे ओएसडी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी) म्हणून का पाहिले. या दरम्यान शाळांमध्ये होत असलेल्या फीवाढी विरोधात उचलेल्या आवाजावर प्रविण यांनी महत्वाची भुमिका बजावली होती. 300 कार्यकर्त्यांच्या मदतीने दिल्लीतल्या 990 सरकारी शाळांची पाहाणी पाच दिवसात पाहाणी केली होती.

2015 च्या निवडणुकीपुर्वी जगंपुराचे उमेदवार एमएस धीर पाला यांनी भाजपामध्ये प्रवेश केला, त्यांच्या जागी दिल्ली प्रदेशचे उपाध्यक्ष असलेल्या प्रविण यांची वर्णी लागली आणि जगंपुरा मतदार संघातून त्यांनी आमदारकीची निवडणुक लढवली. यावेळी तब्बल 20 हजार मतांच्या फरकांनी त्यांनी विजय मिळवला होता, 2020 निवडणुकीमध्येही मोठ्या फरकाने विजय मिळवत, सत्तेत येण्याचा मान त्यांना मिळाला आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News