जेईई आणि नीट च्या परीक्षा वेळापत्रकात दुसऱ्यांदा बदल; आता "ह्या" महिन्यात होणार परीक्षा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 4 July 2020

काही दिवसांपासून जेईई आणि नीट या परीक्षांच्या वेळापत्रकात कोरोनाच्या पाश्वभूमीवर बदल केला जाऊ शकतो अशी माहिती मिळत होती. अखेर आता इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी होणारी जेईई आणि मेडिकल च्या प्रवेशसाठी होणारी नीट ह्या परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई :- काही दिवसांपासून जेईई आणि नीट या परीक्षांच्या वेळापत्रकात कोरोनाच्या पाश्वभूमीवर बदल केला जाऊ शकतो अशी माहिती मिळत होती. अखेर आता इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी होणारी जेईई आणि मेडिकल च्या प्रवेशसाठी होणारी नीट ह्या परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  कोरोना विषाणूचा प्राधुरभाव हा सर्वत्रच वाढत असल्याने विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षितता लक्षात घेऊन केंद्रीय मनुष्य विकास मंत्रालयाकडून  संबंधित निर्णय घेण्यात आल्याचे कळते. यापूर्वी नीट ची परीक्षा ही जुलै महिन्याच्या २६ तारखेला तर जेईई मुख्य परीक्षा ही १८ ते २३ जुलै दरम्यान होणार होती. परंतु बदललेल्या वेळापत्रकानुसार नीट ची परीक्षा १३ सप्टेंबर ला होणार असून जेईई ची मुख्य परीक्षा ही १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होणार आहे.  तर आयआयटी मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी घेण्यात येणारी  जेईई ऍडव्हान्स ही परीक्षा २७ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. 

विशेष म्हणजे ह्या अगोदर होणाऱ्या परीक्षांकरीता  विद्यार्थ्यांना दिलेल्या परीक्षा केंद्रांवर जाऊनच परीक्षा द्यावी लागत होती, परंतु आता कोरोनाच्या पाश्वभूमीवर दोन्ही परीक्षांसाठी केंद्र बदलण्याची मुभा देखील विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. परीक्षा केंद्र बदलून घेण्याकरिता विद्यार्थी ४ जुलै ते १५ जुलै दरम्यान ऑनलाईन अर्ज करू शकतात. जेईई परीक्षांमार्फत देशभरातील इंजिनीअरिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येतो. तर राष्ट्रीय पात्रतेसह घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेमार्फत देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येतो. 

यावर्षीच्या नीट परीक्षेसाठी देशातील १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. या परीक्षेमार्फत देशभरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येतो. तसेच जेईईच्या मुख्य  परीक्षेसाठी ९ लाखांहून अधिक विद्यार्थांनी अर्ज भरला आहे.  जेईई ची मुख्य परीक्षा ही जेईई ऍडव्हान्स परीक्षेसाठी महत्वाची मानली जाते. जेईई च्या ऍडव्हान्स परीक्षेमार्फत देशभरातील आयआयटींमध्ये प्रवेश देण्यात येतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News