ऑनलाईन शिक्षणासाठी स्क्रीन टाइम निश्चित

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 15 July 2020
  • विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देताना एका दिवसात किती सत्रे असावीत आणि एक सत्र किती कालावधीचे असावे, याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील सर्व शाळांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

नवी दिल्ली :-  विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देताना एका दिवसात किती सत्रे असावीत आणि एक सत्र किती कालावधीचे असावे, याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील सर्व शाळांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
 

सध्या लॉकडाऊनमुळे देशातील सर्वच शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय अवलंबण्यात आला;  मात्र शाळेकडून ऑनलाईन शिक्षण देत असताना विद्यार्थी दिवसभरातून किती वेळ मोबाईल अथवा संगणकापुढे बसून राहतील,  त्यांचा स्क्रीन टाइम किती असावा, याबाबत काही पालकांनी शंका उपस्थित केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ऑनलाईन शिक्षणाबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याला "प्रग्याता' असे नाव देण्यात आले आहे.
 

काय आहेत सूचना

 

  • पूर्व-प्राथमिक विद्यार्थ्यांचे दिवसातून ऑनलाईन वर्ग 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ नसावे.
  • इयत्ता पहिली ते आठवीचे दिवसातून चार वर्ग प्रत्येकी 30 ते 45 मिनिटांचे असावे. 

 

महाराष्ट्र मुंबई पुणे नागपूर

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News