अमेरिकेमधील शास्त्रज्ञांना ३,२०० मेगापिक्सेल प्रतिमा घेण्यात यश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 15 September 2020

अमेरिकेमधील शास्त्रज्ञांना  ३,२०० मेगापिक्सेल प्रतिमा घेण्यात यश

अमेरिकेमधील शास्त्रज्ञांना  ३,२०० मेगापिक्सेल प्रतिमा घेण्यात यश

मोबाईल अख्ख जग काबीज केलं असं म्हणायला हरकत नाही. कारण जगातल्या प्रत्येकाला आज मोबाईलची गरज आहे, तसेच अनेक काम मोबाईलशिवाय होत नाहीत. सध्याच्या कोरोनाच्या काळात तुम्ही पाहिलं की, अनेकांनी आपली काम मोबाईलवरून केली आहेत आणि अजूनही करीत आहेत. तसेच ऑनलाईन शिक्षणाचं सुध्दा तसंच आहे. कोरोनाचा काळ निश्चित माहित नसल्याने देशभरात मोबाईलवरून ऑनलाईन शिक्षण सुरू केलं. मोबाईलचा अधिक फायदा ग्रामीण भागातील तरूणांना झाला कारण अनेकांनी मोबाईलवरून आपलं शिक्षण सुरू ठेवता आलं.

मोबाईलमध्ये अनेक बदल झाले आहेत, आणि होत सुध्दा आहेत. ज्यावेळी मोबाईल सुरूवातीला आला होता. तो मोबाईल फक्त कॉल करणे, इतकाच मर्यादीत होता. परंतु कालानुरूप त्याच्यात बदल होत गेले. तसेच अनेक कंपन्यानी मोबाईलचं उत्पादन सुरू केलं आणि त्याच्यात स्पर्धा वाढू लागली. प्रत्येकवेळी नवीन मोबाईल येतो, तेव्हा त्याच्यात काहीतरी नवीन पाहायला मिळतं.

अमेरिकेमधील उर्जा विभागाच्या एसएलएसी नॅशनल एक्सेलेरेटर प्रयोगशाळेत, शास्त्रज्ञांनी जगातील पहिल्या ३,२०० मेगापिक्सलच्या प्रतिमा कॅप्चर केल्या आहेत. हे अमेरिकेतील शास्त्रज्ज्ञांना आलेलं मोठं यश असून पूर्वीच्या वापरकर्त्यांना १० ते १२ मेगापिक्सेलला समर्थन देण्यात आले होते. परंतु कालातराने मोठी प्रगती करण्यात यश आले आहे.

अमेरिकेमधील उर्जा विभागाच्या एसएलएसी नॅशनल एक्सेलेरेटर प्रयोगशाळेत, वैज्ञानिकांनी जगातील पहिल्या ३,२०० मेगापिक्सेल प्रतिमा घेण्यात यश आलं आहे. इमेज सेन्सरच्या मदतीने घेतल्याने ही कामगिरी यशस्वी झाली आहे. काही काळाने ही जागातील सर्वात मोठ्या कॅमे-याचा भाग असेल असं शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे.

कॅमेर्‍याची क्षमता अपार आहे. चिलीमध्ये स्थित लेगसी सर्वे ऑफ स्पेस टाईम (एलएसएसटी) दुर्बीण हा कॅमेरा पूर्ण झाल्यावर तो प्रथम वापरला जाईल. विश्वाच्या रचनेचा अभ्यासपासून ते खगोलशास्त्रीय विज्ञान शोधण्यासाठी एलएसएसटी दुर्बिणीच्या अनुषंगाने त्याचा वापर करणे शक्य होईल.

वेधशाळेचे संचालक एस. एल. ए. सी. चे स्टीव्हन कान म्हणतात, “संपूर्ण रुबिन वेधशाळेच्या प्रकल्पांमधील ही कामगिरी महत्त्वपूर्ण आहे.” ते पुढे म्हणाले, “एलएसएसटी कॅमेरा फोकल प्लॅनचे काम पूर्ण होणे आणि त्यातील यशस्वी चाचण्या कॅमेरामध्ये टिपणे हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे.  जो रुबीन वेधशाळेला पुढच्या पिढीतील खगोलशास्त्रीय विज्ञान देण्यास सक्षम करेल.”

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News