जे. डी. भर्डा हायस्कूलमध्ये दिमाखदार अशा विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 February 2020

प्रदर्शन पाहण्याकरिता दक्षिण मुंबईतील विविध शाळांना जे. डी. भर्डा हायस्कूलचे चेअरमन स्टेनली डिसूझा, प्रशासक तहसीन खान यांनी आमंत्रित केले होते.

मुंबादेवी : ग्रॅंट रोड येथील जे. डी. भर्डा हायस्कूलमध्ये शुक्रवारी जागतिक विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नगरसेविका मीनल पटेल यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले.

प्रदर्शन पाहण्याकरिता दक्षिण मुंबईतील विविध शाळांना जे. डी. भर्डा हायस्कूलचे चेअरमन स्टेनली डिसूझा, प्रशासक तहसीन खान यांनी आमंत्रित केले होते.

प्रदर्शनात सौरऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्टॉप पोलुशन, सेव्ह नेचर, सेव्ह वाइल्ड लाईफ एनिमल्स, पवनचक्कीद्वारे वीजनिर्मिती आदी विषयांवरील प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले होते. शाळेच्या प्राचार्या रश्‍मी पाटणकर यांनी मुलांच्या कलागुणांचे कौतुक केले.

प्रशासक तेहसीन खान यांनी विज्ञान विषयात उत्तुंग यश संपादित करावे, अशा शुभेच्छा दिल्या. नगरसेविका मीनल पटेल यांनी विज्ञान प्रदर्शन पाहत आपला आनंद व्यक्त केला. चांगले उपक्रम राबवण्यासाठी शाळेला सहकार्य केले जाईल, असे त्या म्हणाल्या

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News