पवनीच्या विज्ञान महाविद्यालयात गणितीय अभ्यासक्रमाच्या कार्यशाळेचे आयोजन

अखिल मुंडले
Thursday, 5 March 2020

पवनी : श्री. शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित विज्ञान महाविद्यालय, पवनी येथे उद्या शुक्रवार दिनांक ०६ मार्च रोजी गणितीय अभ्यासक्रमातील घडामोडींचे राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

पवनी : श्री. शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित विज्ञान महाविद्यालय, पवनी येथे उद्या शुक्रवार दिनांक ०६ मार्च रोजी गणितीय अभ्यासक्रमातील घडामोडींचे राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. के.सी. देशमुख (विज्ञान तंत्रज्ञान नागपूर विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता), प्रमुख पाहुणे म्हणुन प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा (महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय आरमोरी) निमंत्रक म्हणुन डॉ. एम. एस. बोरकर, प्रा. जी. डी. केदार, प्राचार्य डॉ. ए. बी. बुरडकर (नूतन आदर्श महाविद्यालय, उमरेड) यांच्यासह डॉ. एस. पी. पवार (एस. एन. मोर विज्ञान महाविद्याल, तुमसर) इत्यादी मान्यवर उपस्थित असतील. 

कार्यक्रमाचे संयोजक म्हणून डॉ. कृष्णा कारु,  IQAC समन्वयक डॉ. अविनाश अणे, डॉ. विजय वि. लेपसे, (प्राचार्य विज्ञान महाविज्ञालय, पवनी) हे उपस्थित राहाणार आहेत. तरी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थित राहुन या राज्यस्तरीय कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहान महाविद्यालयाने केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News