"३० सप्टेंबर पर्यंत शाळा, महाविद्यालय बंद.. मग परीक्षा घेणार कशा?"; मंत्री उदय सामंतांचा केंद्र आणि यूजीसीला सवाल  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 31 August 2020
  • अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या ३० सप्टेंबर च्या अखेर पर्यंत घेण्यात याव्या या यूजीसीच्या निर्णया विरोधात विद्यार्थी आणि युवासेनेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
  • विद्यार्थ्यांचे आरोग्य हित लक्षात घेऊन अंतिम वर्षाच्या परीक्षा ह्या रद्द करण्यात याव्या अशी मागणी विद्यार्थी, युवासेना आणि काही राज्य सरकारांकडून केली जात होती.

मुंबई :- अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या ३० सप्टेंबर च्या अखेर पर्यंत घेण्यात याव्या या यूजीसीच्या निर्णया विरोधात विद्यार्थी आणि युवासेनेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. विद्यार्थ्यांचे आरोग्य हित लक्षात घेऊन अंतिम वर्षाच्या परीक्षा ह्या रद्द करण्यात याव्या अशी मागणी विद्यार्थी, युवासेना आणि काही राज्य सरकारांकडून केली जात होती. परंतु या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने २८ ऑगस्ट रोजी सुनावणी देत विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या रद्द केल्या जाऊ शकत नाहीत त्या घ्यावयाच लागतील असा निर्णय दिला.

यूजीसीने अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या ३० सप्टेंबर पर्यंत घेण्यास सांगितले आहे. परंतु काल केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या पत्रकात ३० सप्टेंबर पर्यंत शाळा, महाविद्यालय ही बंदच असतील असे सांगण्यात आले आहे, तसेच अनेक ठिकाणी टाळेबंदीचे निर्बंध केंद्राकडून अजूनही शिथिल करण्यात आलेले नाहीत. महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल या विषयी ट्विट करून केंद्र सरकार आणि यूजीसीला धारेवर धरलं. ते म्हणाले की, यूजीसी म्हणत की ३० सप्टेंबर पर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्या आणि एकीकडे केंद्र सरकार म्हणत की कोरोना महामारीमुळे देशातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद राहतील. मग नक्की करायचं काय? शाळा महाविद्यालय बंद असणार असतील तर परीक्षा घ्यायच्या कश्या? असा सवाल मंत्री उदय सामंत यांनी केंद्र सरकार आणि यूजीसीला विचारला.   

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News