सोनू सूदकडून गरजू मुलांना स्कॉलरशिप; असा करा अर्ज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 14 September 2020
  • कोरोनाच्या काळात सोनू सूदने अनेक लोकांना मदत केली आहे. सर्वात पहिले त्यांने परंप्रातीय मजूरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी त्यांना बस सेवा करून दिली.
  • त्यांनतर प्रवासी मजुरांसाठी रोजगार अॅप आणि त्या अॅपच्या माध्यमातून त्यांना घराची ऑफर दिल्या नंतर आता सोनू सूदने गरजू मुलांच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप सुरू केली आहे.

मुंबई :- कोरोनाच्या काळात सोनू सूदने अनेक लोकांना मदत केली आहे. सर्वात पहिले त्यांने परंप्रातीय मजूरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी त्यांना बस सेवा करून दिली. त्यांनतर प्रवासी मजुरांसाठी रोजगार अॅप आणि त्या अॅपच्या माध्यमातून त्यांना घराची ऑफर दिल्या नंतर आता सोनू सूदने गरजू मुलांच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप सुरू केली आहे. कोरोनाच्या या परिस्थितीत सोनू सूदने तशी अनेक गरजू मुलांना शिक्षणात मदत केल्याचे आपण पाहिले आहे आणि आता त्याने आणखी एक पाऊल पुढे टाकत स्कॉलरशिप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

गरीब आणि गरजू मुले, ज्यांना पैशाअभावी शिक्षण पूर्ण करता येत नाही, त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सोनू सूदने पुढाकार घेतला आहे. सोनूने अशा मुलांसाठी स्कॉलरशिप सुरू केली आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. सोनूने याबाबत ट्वीट केले आहे.

 

 

"जेव्हा सर्व शिकतील, तेव्हाच हिंदुस्तान पुढे जाईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फुल स्कॉलरशिप लाँच करत आहे. आर्थिक आव्हाने कोणत्याही लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी रोखू शकत नाहीत असा विश्वास मला आहे. पुढील दहा दिवसांत तुम्ही scholarships@sonusood.me यावर एंट्री करा आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचेन", असे ट्वीट सोनूने केले आहे.

सोनू म्हणाला, "आपले भविष्य आपली क्षमता आणि मेहनत ठरवेल. आपण कुठून आलो आहोत, आपली आर्थिक स्थिती काय आहे याचा काही ही संबंध नाही. हा माझा एक प्रयत्न आहे. शाळा संपल्यानंतर पुढील शिक्षणासाठी पूर्ण स्कॉलरशिप, जेणेकरून तुम्ही पुढे जाल आणि देशाच्या प्रगतीत योगदान द्याल. scholarships@sonusood.me यावर ई-मेल करा."

 

 

या पोस्टरमध्ये मॅनेजमेंट, वैद्यकीय, कायदे आणि शेतीविषयक अशा सर्व कोर्सेचा समावेश असल्याचे दिसते आहे. ज्या कुणाला आपले शाळे नंतरचे शिक्षण पूर्ण करायचे आहे, त्यांच्यासाठी आता आर्थिक अडचण राहणार नाही. कारण त्यांना सोनू सूदने मदतीचा हात दिला आहे.

कोरोना लॉकडाऊनमध्ये स्थलांतरीत मजुरांना मदत करून बॉलिवूडमध्ये खलनायक अभिनेता सोनू सूद रिअल लाइफमध्ये हिरो ठरला. प्रवासी मजुरांशिवाय देशातील अनेक गरजूंना त्याने मदत केली आणि हेल्पालाइन जारी केली. शिवाय सोशल मीडियावरही त्याला अनेक मेसेज येऊ लागले. सोनूला दररोज हजारोंच्या संख्येने मदत मागणारे मेसेज येतात आणि त्यातील जास्तीत जास्त लोकांना मदत पुरवण्याचा प्रयत्न सोनू करतो.

फक्त आपल्या मदत मागणारेच नव्हे तर त्याला बातम्यांमधून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या कुणाला मदतीची गरज आहे, असे दिसते, त्यांची माहिती मिळवून तो त्यांना स्वत: मदत करतो. अशा अनेकांचे वर्तमान त्याने सावरले आहे आणि भविष्य साकारण्यासाठी पाठिंबा दिला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News