IBPS ची नियोजित वेळेत परीक्षा होणार; प्रवेश पत्र जारी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 8 September 2020

येत्या १२ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर दोन दिवस आरआरबी अधिकारी पदाची पुर्व परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर कार्यालयीन सहाय्यक पदाची पुर्व परीक्षा १९, ३० आणि २६ सप्टेंबर २०२० रोजी घेतली जाईल, असे आयबीपीएसने जाहीर केले.

मुंबई : बँक अधिकारी पदाची पुर्व परीक्षा स्थगीत केल्यानंतर नियोजित वेळात परीक्षा घेण्याचा निर्णय आयबीपीएसने मंगळवारी (ता.08) जाहीर केला. त्यासाठी लागणारे प्रवेश पत्र जारी करण्यात आले. काही कारणामुळे बँक अधिकारी आणि सहाय्यक पदाच्या परीक्षा स्थगीत केल्याची माहिती आयबीपीएसच्या संचालकांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सोमवारी (ता.०७) दिली. मात्र नियोजित वेळात परीक्षा घेणार असल्याचे पुन्हा जाहीर केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना पार गोंधळ उडाला. 

येत्या १२ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर दोन दिवस आरआरबी अधिकारी पदाची पुर्व परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर कार्यालयीन सहाय्यक पदाची पुर्व परीक्षा १९, ३० आणि २६ सप्टेंबर २०२० रोजी घेतली जाईल, असे आयबीपीएसने जाहीर केले. पुर्व, मुख्य अशा दोन परीक्षा घेतल्या जाणार आहे. पुर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेला अर्ज करता येतो. त्यानंतर मुख्य परीक्षा घेतली जाते. मुख्य परीक्षेच्या मार्कांवर गुणवत्ता यादी लावली जाते. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी आयबीपीएसने संपुर्ण तयारी केली आहे. 

प्रवेश पत्र कसे मिळणार

  • उमेदवारांनी ibps.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अॅडीट कार्ड डाऊनलोड करावे
  • त्यासाठी युजर्स आडी आणि पासवर्ड टाकुण लॉग इन करावे. त्यानंतर कार्ड डाऊनलोड करता येईल.

उमेदवारांनी घ्यावयाची खबरदारी

  • उमेदवारांना परीक्षा केंद्राची माहिती मोबाईलद्वारे दिली जाणार आहे. मोबाईल/ अॅडमीट कार्ड दिलेला पत्ता आणि वेळ यानुसार उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहयाचे आहे.
  • मुखपट्टी, हॉडग्लोज, पाणी बॉटल, हाड सॉनिटायझर, प्रवेश पत्र त्यासोबत ओळखपत्र ओरीजल घेऊन जायचे आहे.
  • प्रेवश पत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
     

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News