अखेर एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 10 January 2020
  • महाराष्ट्रातील विविध इंजिनिअरिंग महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले.
  • ७ जानेवारी ते ७ मार्चदरम्यान परीक्षाशुल्क ऑनलाइन स्वरूपात भरता येईल. पीसीएम आणि पीसीबी अशा दोन गटांमध्ये ही परीक्षा होईल.

नागपूर : महाराष्ट्रातील विविध इंजिनिअरिंग महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले. बीई, बीटेक, बीफार्म, कृषी, फिशरीज सायन्स, डेअरी टेक्‍नॉलॉजी या अभ्यासक्रमांसाठी १३ ते १७ एप्रिल आणि २० ते २३ एप्रिल या काळात प्रवेश प्रक्रिया घेण्यात येईल. 

सीईटी सेलमार्फत ऑनलाइन स्वरूपात ही परीक्षा होईल. एमबीए आणि एमएमएस या दोन अभ्यासक्रमांसाठी परीक्षा १४ आणि १५ मार्च रोजी घेण्यात येईल. एमसीएसाठी प्रवेशपरीक्षा २८ मार्च होईल. एम.आर्क.ची प्रवेश परीक्षा १० मे रोजी होईल. हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेक्‍नॉलॉजी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा १० मे रोजी होईल. पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा १६ मे रोजी घेण्यात येईल. या सर्व परीक्षा ऑनलाइन घेण्यात येतील. इंजिनिअरिंग परीक्षेसाठीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया ७ जानेवारी रोजी सुरू झाली. २९ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येतील. सीईटीच्या संकेतस्थळावर ७ जानेवारी ते ७ मार्चदरम्यान परीक्षाशुल्क ऑनलाइन स्वरूपात भरता येईल. पीसीएम आणि पीसीबी अशा दोन गटांमध्ये ही परीक्षा होईल.

बी.ई. आणि बी.टेक.ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना फिजिक्‍स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्‍सचे पेपर्स देणे बंधनकारक आहे. लेखनिकाची सुविधा घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक तासामागे २० मिनिटे अतिरिक्त वेळ देण्यात येईल. परीक्षेत अकरावीच्या अभ्यासक्रमाला २० टक्के तर बारावीच्या अभ्यासक्रमाला ८० टक्के महत्त्व राहील. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसून, उपयोजन आधारित प्रश्‍न विचारले जातील. मॅथेमॅटिक्‍स, फिजिक्‍स व केमिस्ट्री, बॉटनी व झूलॉजी असे तिन्ही पेपर प्रत्येकी शंभर गुणांचे राहतील. प्रत्येक पेपरला दीड तासाचा अवधी राहील. एमएचटीसीईटीचा निकाल पर्सेंटाइलमध्ये जाहीर केला जाईल. परीक्षेचे माध्यम इंग्रजी आणि मराठी किंवा उर्दू राहील. मॅथेमॅटिक्‍सचा पेपर मात्र केवळ इंग्रजीत देता येईल. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रासाठी पर्याय देता येणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News