बालवाडी ते १२ वी ऑनलाइन वर्गांचं वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 23 July 2020
  • कोरोनाच्या काळात शैक्षणिक वर्षे वाया जाईल अशी भीती पालकांना वाटत असताना, राज्य सरकारने विद्यार्थ्यांना सरासरीनुसार मार्क देवून उत्तीर्ण केले.
  • तसेच विद्यार्थ्यांचं पुढील वर्षांचं ऑनलाइन शिक्षण सुरू केलं.
  • महाराष्ट्रात मागील चार महिन्यांपासून कोरोनाचा आलेख वाढतचं असून कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

कोरोनाच्या काळात शैक्षणिक वर्षे वाया जाईल अशी भीती पालकांना वाटत असताना, राज्य सरकारने विद्यार्थ्यांना सरासरीनुसार मार्क देवून उत्तीर्ण केले. तसेच विद्यार्थ्यांचं पुढील वर्षांचं ऑनलाइन शिक्षण सुरू केलं. महाराष्ट्रात मागील चार महिन्यांपासून कोरोनाचा आलेख वाढतचं असून कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची संख्या ३ लाखांहून अधिक असून कोरोनाचा धोका अधिक आहे, यामुळे प्रत्यक्षात शाळा केव्हा सुरू होतील हे सांगू शकत नाही. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती निवळत नाही, तोवर प्रत्यक्ष शाळा सुरू होणं अशक्य आहे. त्यानुसार वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियावर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वेळापत्रक जाहीर केलं आहे.
 
प्रत्येकवर्षी जूनच्या दुस-या आठवड्यात शालेय शिक्षण सुरू केलं जातं. परंतु कोरोनामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाने घ्यावा असा आदेश दिला आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण घेण्याचं निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. पहिलीच्या वर्गापासून १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचं ऑनलाइन शिक्षणाचं वेळापत्रक राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतचं सोशल मीडियावर जाहीर केलं आहे.
 
१) बालवाडी - विद्यार्थ्यांना सोमवार ते शुक्रवार ऑनलाइन पध्दतीने ३० मिनिटे शिकवलं जाणार. विशेष म्हणजे पालकांशी संवाद साधून ऑनलाइन मार्गदर्शन केलं जाणार आहे.
२) पहिली ते दुसरी - या वर्गात शिकणा-या विद्यार्थ्यांना सोमवार ते शुक्रवार या दिवसात ३० मिनिटांचे दोन वर्ग घेतले जातील. त्याचबरोबर त्यापैकी १५ मिनिटे पालकांना अभ्यासक्रमाविषयी मार्गदर्शन केले जाईल. 
३) तिसरी ते आठवी - या वर्गात शिकत असणा-या विद्यार्थ्यांना दररोज ४५ मिनिटांचे दोन वर्ग घेतले जातील असं वेळापत्रकामध्ये नमूद करण्यात आलं आहे.
४) नववी ते बारावी – या वर्गात शिकत असणा-या विद्यार्थ्यांना दररोज ४५ मिनिटांचे चार वर्ग असणार आहेत. त्यातून त्यांना ऑनलाईन माध्यमातून शिक्षण दिलं जाणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News