SBIची 'ही' योजना कर्मचाऱ्यांना सन्मान देणार; 14 हजार तरुणांना नोकऱ्या मिळणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 8 September 2020

समाज माध्यमांवर एसबीआयने कॉस्ट कटींग सुरू केल्याची चर्चा सुरु होती यावर एसबीआयने स्पष्टीकरण दिले. कॉस्ट कटींग केली जाणार नाही तर बँकेचा मोठा विस्तार केला जाणार आहे, त्यासाठी यंदा 14 हजार नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल ही कॉस्ट कटिंग नसून बँकेचा विस्तार आहे असे एसबीआयने सांगितले.

मुंबई : देशातील तरुणाईसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने नोकरीचे महाद्वार खोलले. त्यामुळे तरुणांना नोकरीची  सुवर्णसंधी मिळणार आहे. यंदा 14 हजार नवीन पदे भरणार असल्याचे एसबीआयने सांगितले. युवकांना रोजगार देण्यासाठी एसबीआय नेहमी अग्रेसर असते. नॅशनल अपप्रेंडशिप योजनेतून युवकांना नोकरी उपलब्ध करून देण्याचे काम एसबीआय करते. 

एसबीआयमध्ये सध्या 2 लाख 50 कर्मचारी आहेत. त्यापैकी 30 हजार 190 कर्माचाऱ्यांना 'सेकंड इनिंग टॉप व्हीआरएस 2020' योजना लागू होणार आहे. या योजनेनुसार ज्या कर्मचाऱ्यांनी 25 वर्ष नोकरी केली किंवा ज्यांचे वय 55 वर्षापेक्षा अधिक आहे अशा कर्मचाऱ्यांना व्हीआरएस घेण्याची सोय बँकेने उपलब्ध करून दिली. ही योजना 1 डिसेंबर 2020 पासून सुरू होणार आणि फेब्रुवारी 2021 पर्यंत चालणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना स्वाभीमानाने निवृत्त होण्याची संधी या योजनेमुळे मिळणार आहे. समाज माध्यमांवर एसबीआयने कॉस्ट कटींग सुरू केल्याची चर्चा सुरु होती यावर एसबीआयने स्पष्टीकरण दिले. कॉस्ट कटींग केली जाणार नाही तर बँकेचा मोठा विस्तार केला जाणार आहे, त्यासाठी यंदा 14 हजार नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल ही कॉस्ट कटिंग नसून बँकेचा विस्तार आहे असे एसबीआयने सांगितले.

'सेकंड इनिंग टॉप व्हीआरएस 2020' योजना  

ज्या कर्मचाऱ्यांना बँकेची सर्व सेवा- सुविधा मिळाली आहे आणि स्वच्छेने निवृत्त व्हायचे आहे अशा कर्मचाऱ्यांसाठी ही योजना आहे. वयोमानानुसार आरोग्याच्या अनेक समस्या कर्मचाऱ्यांना भेडसावत असतात. वैयक्तिक अडचणीमुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागते तर काहींना नोकरीतून मुक्त होण्याची इच्छा असते अशा कर्मचाऱ्यांसाठी सन्मानाने निवृत्त होण्याची सुवर्णसंधी आहे. जे कर्मचारी सेवानिवृत्तीसाठी अर्ज करणार आहेत त्यांना राहिलेल्या कालावधीचे 50 टक्ते वेतन सानुग्रह म्हणून मिळणार आहे. निवृत्ती झाल्यानंतर दोन वर्षांनी पुन्हा आपल्या पदावर काम करण्याची संधी दिली जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नवचैतन्य निर्माण होईल असे बँकेकडून सांगण्यात आले. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News