एसबीआयने अनुकंपाखाली नोकरी नाकारली; तरुणाने चक्क डुप्लीकेट शाखा सुरु केली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 11 July 2020

डुप्लीकेट शाखा पाहून खऱ्या एसबीआयचे कर्मचारी आश्चर्यचकीत झाले. कारण सेम टू सेम एसबीआय सारखीत डुप्लीकेट शाखा दिसत होती.

चेन्नई: देशातली सर्वांत मोठी बॅंक एसबीआयने तरुणाला अनुकंपाखाली नोकरी नाकारली, त्यामुळे तरुणांनी बॅंक प्रशासनाला कंटाळून चक्क एसबीआयची डुप्लीकेट शाखा सुरु केली. डुप्लीकेट शाखा पाहून खऱ्या एसबीआयचे कर्मचारी आश्चर्यचकीत झाले. कारण सेम टू सेम एसबीआय सारखीत डुप्लीकेट शाखा दिसत होती.  पोलिसांनी डुप्लीकेट शाखेची पाहणी केल्यानंतर त्यांना सुद्धा धक्का बसला. डुप्लीकेट शाखेच्या बाजूला डुप्लीकेट एटीम केंद्र होते. ग्राहकांना संशय येवू नये म्हणून डुप्लीकेट संकेतस्थळ निर्माण करण्यात आले होतो.

डुप्लीकेट शाखेचा एक ग्राहक पैसे उचण्यासाठी दुसऱ्या एसबीआय शाखेत गेला. मात्र खऱ्या बॅंक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी हे खाते एसबीआयचे नाही असे सांगितले. तेव्हा ग्राहकाच्या पायाखालची माती सरकली. डुप्लीकेट शाखेच्या ग्राहकाने खऱ्या एबीआयच्या कर्मचाऱ्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यावेळी सर्वांना विश्वास बसला नाही. एसबीयाच्या कर्मचाऱ्यांनी थेट डुप्लीकेट शाखेला भेट दिली, तेव्हा सर्व प्रकार पाहून अवाक्क झाले. कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सर्व प्रताप सांगितला. तेव्हा तरुण कमल बाबू, ए. कुमार आणि एम. मनिकर तीन व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर भारतीय दंड सहिता कलम ४७२, २६८, १०९ प्रमाणे गुन्हा नोंदवला आला आहे.   

डुप्लीकेट शाखेचा सुत्रधार कमल बाबू यांचे वडील एसबीआय बॅंकेत कर्मचारी होते. त्यामुळे कमलचे बॅंकेत नेहमी जेणे- जाणे असायचे, बॅंकेची बरीच माहिती कमलला होती. दुर्दैवाने कमलच्या वडीलांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसात आई निवृत्त झाली. वडीलांच्या जागी अनुकंपाखाली नोकरी मिळावी यासाठी कमलने अनेकवेळा बॅंकेच्या फेऱ्या मारल्या. मात्र, कमलला नोकरी मिळाली नाही. त्यामुळे कमलेशने एसबीआयची डुप्लीकेट शाखा सुरु केली. मात्र कमलचा हा प्लॉन फसला. 
    

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News