चित्रपटामधील सायलीची नवी भूमिका 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 26 December 2019

काही दिवसांपूर्वीच तिच्या दोन मराठी चित्रपटांची घोषणा झाल्यानंतर आता ‘दाह’ या चित्रपटासाठीही सायलीची निवड झाली आहे. या चित्रपटामधील तिचा लूकही प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘काहे दिया परदेस’ या मालिकेमुळे अभिनेत्री सायली संजीवच्या फॅन फॉलोविंगमध्ये प्रचंड वाढ झाली. मालिकांनंतर सायली आता मराठी चित्रपटांकडे वळली आहे.

काही दिवसांपूर्वीच तिच्या दोन मराठी चित्रपटांची घोषणा झाल्यानंतर आता ‘दाह’ या चित्रपटासाठीही सायलीची निवड झाली आहे. या चित्रपटामधील तिचा लूकही प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा कौटुंबिक आहे.

सायलीबरोबरच अभिनेते गिरीश ओक ‘दाह’मध्ये मुख्य भूमिकेत  आहेत. अनिकेत बडोले निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन मल्हार गणेश यांनी केले आहे. विशेष म्हणजे सायली तिच्या प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या रूपात दिसणार आहेत. या येत्या वर्षात सायलीच्या चित्रपटांचा ट्रिपल धमाका असणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News