सायली- ऋषी पुन्हा एकत्र...

मनिष तरे
Saturday, 18 April 2020

प्रेक्षकांच्या उत्तंड प्रतिसादामुळे शिव-गौरीच्या जोडीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता पुन्हा एकदा ही जोडी ‘लाजीरा’ गाणाच्या माध्यमातून पडद्यावर झळकली.

मुंबई - छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून अभिनेता ऋषी सक्सेना आणि अभिनेत्री सायली संजीव प्रेक्षकांच्या भेटीस आले. प्रेक्षकांच्या उत्तंड प्रतिसादामुळे शिव-गौरीच्या जोडीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता पुन्हा एकदा ही जोडी ‘लाजीरा’ गाणाच्या माध्यमातून पडद्यावर झळकली.

देशभरात कोरोना विषाणूच्या संकटामुळे लॉकडाऊन दरम्यान प्रियकरांसाठी प्रेमाची अनोखी कथा गाणाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. लग्नानंतरचे प्रमेळ क्षण गाण्यात दाखवण्यात आले आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या गाण्याला प्रेक्षकांचा, चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 

लाजीरा गाण्यातून लग्नानंतरची प्रेमकथा तसेच सायली संजीव आणि ऋषी सक्सेना यांच्या प्रेमाचा अनोखा अंदाज प्रेक्षकांना पाहण्यास मिळणार आहे. हे गाणे केवल वाळंज आणि स्नेहा म्हाडिक यांनी गायले आहे तर केवल वाळंज आणि विकास विश्वकर्मा यांनी गाण्याला संगीत दिले आहे.

साईनाथ राजाध्यक्ष हे या गाण्याचे निर्माते आहेत तर रुपेश पावसकर हे कार्यकारी निर्माते आहेत. रेड बल्ब म्युझिक हे लाजीरा गाण्याचे प्रस्तुतकर्ते आहेत. पुढील दिवसांत शिव-गौरीच्या जोडीसारखीच प्रसिद्धी लाजीरा गाण्याला मिळणार का... हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News