'या' मराठी अभिनेत्रीच्या रूपात 'सविता भाभी' येणार तुमच्या भेटीला
पुणे: काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये एका बॅनरची चर्चा चांगलीच रंगली होती. ती म्हणजे सविता भाभी... तू इथच थांब! असे बॅनर पुण्यामध्ये अनेक ठिकाणी लावण्यात आले होते या बॅनरमुळे पुणेकर चक्रावून गेले होते. याबद्दल अनेक तर्कवितर्कदेखील लावण्यात आले होते आता सविता भाभी हे नेमकं प्रकरण काय आहे याचा उलगडा मात्र झाला आहे.

लवकरच मराठीतला 'अश्लील उद्योग' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि त्याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे पोस्टर पुण्यामध्ये जागोजागी लावण्यात आल्याचे समजले आहे. परंतु या पोस्टरमधील सविता भाभी नक्की कोण? हा प्रश्न सर्वानाच पडला होता, तर ही सविताभाभी दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री सई ताम्हणकर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सई ताम्हणकर, अभय महाजन आणि पर्ण पेठे यांची मुख्य भूमिका असणारा 'अश्लील उद्योग' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. हा ट्रेलर एकंदरीत अडीच मिनिटाचा असून त्यामध्ये चित्रपटाचं नेमकं कथानक काय आहे याची झलक पाहायला मिळते. त्याचप्रमाणे ट्रेलरच्या शेवटी सविता भाभी नक्की कोण आहे याचा उलगडा होतो. म्हणजेच ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येतं की, 'अश्लील उद्योग' चित्रपटात सई ताम्हणकर ही सविता भाभीच्या भूमिकेत दिसणार आहे.
आकोल राजवाडे दिग्दर्शित 'अश्लील उद्योग' हा चित्रपट येत्या हा मार्चला रिलीझ होणार असून या चित्रपटात अमेय वाघ,अक्षय टांकसाळे, सायली पाठक,ऋतुराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके, यांसारखी तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.