सौरभ धूत राष्ट्रीय युवा संशोधन स्पर्धेत अव्वल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 February 2020

बदनापूर : येथील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी प्रथम वर्षाच्या सौरभ धूत या  विद्यार्थ्याने औषधी कंपन्यांनी बुलडाणा येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील युवा संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. 

बदनापूर येथील निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या बी. फार्म. प्रथम वर्षातील विद्यार्थी सौरभ रामनारायण धूत याने बुलडाणा येथील राजर्षी शाहू महाविद्यालयातील राष्ट्रीय पातळीवरील युवा संशोधन स्पर्धेत सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत संपूर्ण भारतभरातील फार्मसीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. विविध औषधी कंपन्यांनी घेतलेल्या या स्पर्धेत हिमोफिलिया या दुर्धर आजारावर सौरभ मागील अनेक दिवसांपासून संशोधन व सामाजिक कार्य करत असल्याबाबत त्याला प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. लहान मुलांमध्ये या आजाराविषयी विशेष जनजागृती करण्यासाठी तो विविध उपक्रम राबवीत असतो. सौरभ धूत यास संशोधन व सामाजिक कार्यासाठी प्रा. हटकर, प्रा. फोके, प्रा. मुळे, प्रा. न्यायाधीश हे मार्गदर्शन करत असतात. 

या स्पर्धेत त्याला प्रमाणपत्र व २१ हजार रुपये रोख देऊन सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल त्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर, सचिव डॉ. सौ. एम. डी. पाथ्रीकर, कार्यकारी संचालक डॉ. देवेश पाथ्रीकर, डॉ. एस. एस. शेख, डॉ. श्रीमती एन. जी. खान, प्राचार्य सुनील जायभाये, कल्याण देवकते, नंदकिशोर नाईकवाडे, नारायण लव्हाळे, बाबासाहेब बनसोड, मनोहर गजर, नीलेश बिल्लाडे आदींनी अभिनंदन केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News