सातारच्या तरूणाईचा वाढलाय चांगलाच पारा, जाणून घ्या त्यामागचं कारण... 

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Thursday, 16 January 2020

साताऱ्यामध्ये संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज बंद पाळला गेला. सातारकरांनी संपूर्ण शहरातून निषेदार्थ मोर्चा काढत कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय....संजय राऊत हाय हाय... अशा घोषणा दिल्या

सातारा : महाराष्ट्राच्या राजकारणाने सध्या वेगळेच वळण घेतले आहे. सातारचे माजी खासदार उदयराजे भोसले यांच्याकडे शिवाजी महाराजांचा वंशज असल्याचा पुरावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मागितला आहे. या व्यक्तव्यावरून साताऱ्याच्या तरूणाई रस्त्यावर उतरत निषेध करताना दिसते आहे. 
 
साताऱ्यामध्ये संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज बंद पाळला गेला. सातारकरांनी संपूर्ण शहरातून निषेदार्थ मोर्चा काढत कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय....संजय राऊत हाय हाय... अशा घोषणा दिल्या, त्याचबरोबर दोन गाढवाच्या गळ्यात राऊत आणि आव्हाड यांच्या नावाचे फलक लावून फिरवण्यात देखील आले. संतप्त कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्याना आवाहन देखील केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, राऊत यांना उद्धव ठाकरेंनी चांगला डॉक्टर बघून तपासून घ्यावे. असं न केल्यास शिवसेना रसातलास गेल्याशियाव राहणार नाही. याचबरोबर काटकर म्हणाले राऊत यांनी आपली वक्तव्य थांबवावीत अन्यथा उदयनराजेंनी म्हटल्याप्रमाणे जनताच त्यांना योग्य आणि चोख उत्तर देईल आणि कायमचा बंदोबस्त करेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News