सारिका कदम यांनी पटकावला सौ " महाराष्ट्राचा " किताब

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 9 March 2020

मुकुट, सन्मानचिन्ह आणि रोख ५१ हजार देऊन मान्यवरांच्या हस्ते सारिका यांचा गौरव करण्यात आला.

घाटकोपर : जागतिक महिला दिनानिमित्त क्‍लॅप क्रिएशनतर्फे ‘शाईन सौ. महाराष्ट्र २०२०’ ही फॅशन शो स्पर्धा नुकतीच दादरमधील हॉटेल कोहिनूर पार्क येथे पार पडली. राज्यभरातील महिला तसेच, फॅशन आणि सिनेजगतातील अनेक मान्यवर कार्यक्रमात सहभागी झाले होते. स्पर्धेत घाटकोपरच्या सारिका कदम यांनी ‘शाईन सौ. महाराष्ट्र २०२०’चा किताब पटकावला. 

मुकुट, सन्मानचिन्ह आणि रोख ५१ हजार देऊन मान्यवरांच्या हस्ते सारिका यांचा गौरव करण्यात आला. चार भिंतीतील व्यवहार खंबीरपणे पेलण्याची क्षमता असलेल्या गृहिणी संधी मिळाल्यास बाहेरही आपली चमक दाखवू शकतात, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कार्यक्रमाचे आयोजक विनोद शिंदे उपस्थित होते. सारिका कदम या सामान्य गृहिणी असून त्या ऑल्वेज हेलपिंग हॅन्ड या संस्थेच्या अध्यक्षा आहेत. गेली अनेक वर्षे त्या दिव्यांग मुलांसाठी कार्य करत आहेत. २५० महिला स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News