अभिनेता ऋत्विक केंद्रेंचा बहुचर्चित "सरगम" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 13 March 2020

मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीत त्याने स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं.

‘मानसीचा चित्रकार तो’ या मालिकेतून अभिनेता ऋत्विक केंद्रेने अभिनय क्षेत्राची एन्ट्री केली. ‘ड्राय डे’ या मराठी चित्रपटातही तो मुख्य भूमिकेत होता. मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीत त्याने स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. आता लवकरच तो ‘सरगम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर अनावरण अलीकडेच पार पडले. या चित्रपटात सोळा-सतरा वर्षांच्या तरुण-तरुणीची प्रेमकथा आहे.

ऋत्विकसोबत या चित्रपटात अभिनेत्री दिशा परदेशी, राजलक्ष्मी, संजय परदेशी, डॉ. सुधीर निकम झळकणार आहेत. दिवंगत लेखक-अभिनेते गिरीश कर्नाड यांचीही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन शिव कदम यांचे आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News