साडी डे मुलींचा होता, पण पण मुलंच आली साडी नेसुन !

सकाळ (यिनबझ)
Friday, 3 January 2020

 तुम्ही असे काही फोटो बघाल ज्याने तुम्ही चक्राऊन जाल. नेहमी वेगवेगळ्या सुंदर अशा साडीत वावरताना दिसतात. मात्र, या कॉलेजमध्ये काहीतरी वेगळेच बघायला मिळाले.

पुणे : डेज म्हणलं की तरूणाईत सळसळता उत्साह दिसतो. साडी डे, रोज डे, टाय डे, ट्रॅडिशनल डे, मिसमॅच डे असे अनेक डेज साजरे केले जाते. पण पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये वेगळेच चित्र दिसले... साडी डे होता, पण सगळेजण बघतच राहिले. 

 स्त्री-पुरुष समानता ही फक्त कागदावर न राहता प्रत्यक्ष आचरणात आणली पाहीजे, यासाठी फर्ग्युसन कॉलेजमध्ये साडी डे व टाय डे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तरुणांनी चक्क साडी नेसली होती तर तरुणींनी टाय, सुट घालून महाविद्यालयात आले होते. त्यामुळे सर्वांचे लक्ष वेधुन घेत होतो.

फर्ग्युसन कॉलेजमध्ये आज साडी डे आणि टाय डे होता. पण तुम्ही असे काही फोटो बघाल ज्याने तुम्ही चक्राऊन जाल. नेहमी वेगवेगळ्या सुंदर अशा साडीत वावरताना दिसतात. मात्र, या कॉलेजमध्ये काहीतरी वेगळेच बघायला मिळाले. येथील एका ग्रुपमधील तीन मुलांनी चक्क साडी परिधान केली होती, तर एका मुलीने ब्लेझर व टाय घातला होता. त्यांच्या या मिसमॅचमुळे सगळेजण त्यांच्याकडे बघतच राहिले. 

आकाश पवार, सुमित होनवडकर आणि ऋषीकेश सानप असे या तिघांचे नाव आहे. केवळ मुलींनीच साडी का परिधान करावी, असा सवाल त्यांनी केलाय. यामागची पार्श्वभूमीही त्यांनी यावेळी सांगितली. ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच कॉलेजमधील एका तरूणाने स्त्री-पुरूष समानता मानता तर मग साडी नेसून दाखवा असे चॅलेंज दिलं होते. हेच चॅलेंज स्विकारत त्यांनी साडी डेला साडी नेसून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News