सरस्वती महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिवस साजरा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 February 2020

मराठी साहित्यकार व साहित्य यांचा परिचय देणारे प्रदर्शन यावेळी लावण्यात आले.

किनवट: सरस्वती महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन गुरुवारी साजरा करण्यात आला. 27 फेब्रुवारी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी साहित्यकार व साहित्य यांचा परिचय देणारे प्रदर्शन यावेळी लावण्यात आले. पत्रकार प्रदीप वाकोडीकर, ऍड मिलिंद सरपे, प्रमोद पहुरकर, जयवंत चव्हाण यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. मार्तड कुलकर्णी. बी एडचे प्राचार्य डॉ. किरण पाईकराव उपस्थित होते
       
 2000 पासून जागतिक स्तरावर बोली भाषा संवर्धन व्हावे कारण जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे अनेक बोली भाषा नष्ट होत आहेत, त्यांचे स्वरूप व संस्कृती यांचे संवर्धन व्हावे म्हणून 27 फेब्रुवारी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने महाविद्यालयात चित्र प्रदर्शन भरविण्यात आले. प्रा अंकुशराव सुरवसे, प्रा. द्वारकप्रसाद वायाळ, डॉ. सुनील व्यवहारे, प्रा. तपणकुमार मिश्रा, डॉ. राजू मोतेराव, आनंद सरतापे यांच्यासह महाविद्यालय, डी. एड् व बी. एड्चे शिक्षक व विद्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News