सुशांत सिंग सोबत सारा एका हॉटेलमध्ये 3 दिवस थांबली; साबिर अहमदने केला खळबळजनक खुलासा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 August 2020

'सुशांत आणि सारा अली खान बॅंकॉक येथील एका हॉटेलमध्ये तीन दिवस राहिले होती' अशी खळबळजनक माहिती सुशांतच्या सहकारी साबिर अहमद यांनी दिली. 

मुंबई : सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणामध्ये रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप केले. रिया सुशांतसोबत वेगवेगळ्या ट्रिवर गेली होती, ट्रिपचा सर्व खर्च सुशांतने उचलला असा आरोप रियावर करण्यात आला. मात्र, यापूर्वी सुशांत अनेक कलाकारांसोबत ट्रिप गेला होता आणि ट्रिपचा सर्व खर्च उचलला अशी माहिती एका प्रसिद्ध न्यूज चैनलच्या मुलाखतीमध्ये रियाने दिली. 'सुशांत आणि सारा अली खान बॅंकॉक येथील एका हॉटेलमध्ये तीन दिवस राहिले होते' अशी खळबळजनक माहिती सुशांतच्या सहकारी साबिर अहमद यांनी दिली. 

डिसेंबर 2018 साली सुशांतने बॅंकॉकची एक ट्रिप आयोजित केली होती, या ट्रिपमध्ये एकूण सात सदस्य होते, सुशांत सिंग राजपूत, सारा अली खान, सिद्धार्थ गुप्ता, कुशल जावेरी, अब्बास, सुशांत बॉडीगार्ड मुस्ताक आणि साबीर अहमजद. सुशांतच्या पीआरओ ग्रुपचे सदस्य आणि अभिनेत्री सारा अली खान आमच्या ट्रिप मध्ये होती. एका प्रायव्हेट जेटने आम्ही बँकॉक पोहोचलो. आयर्लंड या आलिशान हॉटेलमध्ये आम्ही थांबलो. पहिल्या दिवशी सर्व सदस्य बीचवर फिरायला गेले, त्यानंतर सुशांतचे मित्र हे बँकॉक पाहायला गेले. सारा आणि सुशांत दोघेच तीन दिवस हॉटेलमध्ये थांबले होते मात्र बॅकॉकमध्ये त्सुनामी येण्याची शक्यता वर्तवली गेली, त्यामुळे सुशांत, सारा आणि सहकारी मुंबईला परत आले.

दोन रिटर्न तिकीट मिळाले नसल्यामुळे सबिर आणि मुस्ताक दोघांना बँकॉकमध्ये सोडून बाकी भारतात परतले. त्यानंतर साबीर आणि मुस्ताक एक महिना बॅंकॉकमध्ये होतो त्यांचा सर्व खर्च सुशांतने केला, त्यांच्या खर्चासाठी सुशांतने एटीएम कार्ड दिले, त्यानंतर या दोघांना मुंबईहून काही पैसे ट्रान्सफर केले. मुंबईला वापस आल्यानंतर सॅम्युअल मुंबई एअरपोर्टवर घ्यायला आला असे साबिरने सांगितले.

सुशांत या पुर्वीही मित्र मैत्रिणीसोबत अनेक वेळा ट्रिपवर गेला होता, एका वेळी तर सहा मुलींना घेऊन तो आयर्लंडला गेला आणि या ट्रीपवर तब्बल 70 लाख रुपये खर्च केले. त्याचबरोबर एक प्रायव्हेट जेट बुक करण्यात आले होते. सुशांतची लाईफस्टाईल एका हिरो सारखी होती, एका फिल्मस्टार सारख जीवन जगायची सुशांतची इच्छा होती. तो फिल्मस्टार सारख जीनव जगला असे रियाने सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News