सारा-कार्तिकचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 January 2020

आता या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये सारा-कार्तिक एका वेगळ्याच दुनियेत रमलेले दिसत आहेत. खरं तर हे पोस्टर पाहून ऑनस्क्रीनही सारा-कार्तिकची जादू चालणार, असे अंदाज वर्तवले जात आहेत.

सध्या बी-टाऊनमधील बहुचर्चित कपल म्हणजे कार्तिक आर्यन आणि सारा अली खान. कार्तिक-साराची ऑफस्क्रिन केमिस्ट्री भलतीच रंगात असताना या दोघांना ‘लव्ह आज कल’ चित्रपटासाठी विचारण्यात आलं. दोघांनीही ऑनस्क्रीन एकत्र काम करण्यास होकार दिल्यापासूनच सारा-कार्तिकच्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली.

आता या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये सारा-कार्तिक एका वेगळ्याच दुनियेत रमलेले दिसत आहेत. खरं तर हे पोस्टर पाहून ऑनस्क्रीनही सारा-कार्तिकची जादू चालणार, असे अंदाज वर्तवले जात आहेत.

शिवाय त्यांच्या या नव्या लूकला सोशल मीडियावर अगदी कमी कालावधीतच लाखो लाईक्‍स मिळाले आहेत. व्हॅलेंटाईन डे म्हणजेच १४ फेब्रुवारीला सारा-कार्तिक हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News