सारा-कार्तिक करणार नव्या अंदाजाने चित्रपटाचे प्रमोशन 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 February 2020

अहमदाबाद, जयपूरसारख्या शहरामध्ये सारा-कार्तिकने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भ्रमंती केली. आता चक्क मुंबईच्या एका महाविद्यालयामध्येच त्यांनी या चित्रपटाचे गाणे ‘मेहरमा’ लॉन्च केले.

चित्रपटांच्या प्रमोशनसाठी सध्या दिग्दर्शक-निर्माते स्टारकास्टसह वेगवेळ्या शहरात फिरतात. शिवाय प्रमोशन हटक्‍या पद्धतीने कसे होईल, यावरही भर दिला जातो. सारा अली खान आणि कार्तिक आर्यनच्या ‘लव आज कल’ चित्रपटाच्या बाबतीतही असेच घडत आहे.

अहमदाबाद, जयपूरसारख्या शहरामध्ये सारा-कार्तिकने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भ्रमंती केली. आता चक्क मुंबईच्या एका महाविद्यालयामध्येच त्यांनी या चित्रपटाचे गाणे ‘मेहरमा’ लॉन्च केले.

प्रेमकथेवर आधारित असणाऱ्या या चित्रपटाकडे तरुणवर्ग अधिकाधिक आकर्षित व्हावा, यासाठी या चित्रपटाच्या टीमने ही शक्कल लढवली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News