संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा आता २० ऑक्टोबर पासून सुरू होणार

डॉ विलास नांदुरकर
Friday, 16 October 2020

२० ऑक्टोबरपासूनच्या सर्व परीक्षा यापूर्वी ४ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार होणार असून १२ ते १९ ऑक्टोबरच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा आता २० ऑक्टोबर पासून सुरू होणार

अमरावती: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या १२ ऑक्टोबर पासून होणा­ऱ्या परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या.  त्या आता २० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत.

२० ऑक्टोबरपासूनच्या सर्व परीक्षा यापूर्वी ४ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार होणार असून १२ ते १९ ऑक्टोबरच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

परीक्षा देण्याकरिता अॅप विकसीत करण्यात आले असून त्याचे प्रात्याक्षिक यापूर्वीच परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी यु-ट्युबवरुन सादर केले आहे.

विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरळीतपणे द्याव्या, त्यांना कुठलीही अडचण राहू नये, असा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास विद्यापीठाच्या वेबसाईट वरील मुखपृष्ठावर न्युज अॅन्ड अनाउन्समेंटमध्ये विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संपर्क यादी दिली आहे.

विद्यार्थी आपल्या अडचणींचे निराकरण करुन घेण्याकरिता संपर्क यादी मधील कोणालाही फोन करु शकतात. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरळीत होतील, असा विश्वास कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर व प्र-कुलगुरू डॉ राजेश जयपूरकर यांनी व्यक्त केला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News