कानडी दडपशाही झुगारुन राऊत बेळगावात दाखल; असं असणार नियोजन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 January 2020
  • सांयकाळी गोगटे रंगमंदिर येथे संजय राऊत यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार

बेळगाव: पोलिसांची दडपशाही असली तरी सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेला उपस्थित राहण्यासाठी खासदार संजय राऊत बेळगावात दाखल झाले आहे. सांयकाळी 5.30 वाजता गोगटे रंगमंदिर येथे संजय राऊत यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी त्यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला राऊत उपस्थित राहू नयेत यासाठी कर्नाटकी प्रशासनाकडून आयोजकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र, संजय राऊत यांनी कानडी पोलिसांची दडपशाही झुगारुन बेळगावत दाखल झाले. कोणताही अनुचित प्रकार घडूनये म्हणून ठिकठिकाणी पोलीस तैनात केले आहेत. 

कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सांबरा विमान तळावर राऊत यांचे स्वागत करण्यासाठी वाचनालयाचे पदाधिकारी व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, प्रकाश मरगाळे, नेताजी जाधव, महेश जुवेकर, सुनील आंनदाचे, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, शिवसेनेचे प्रकाश शिरोळकर यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बेळगाव, कारवार निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे आदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडण्यात आला. विमानतळावर प्रचंड प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेऊन कार्यकर्त्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला तरीही राऊत यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News