सगळ्यांचं दु:ख जाणुन घेणारं मुंबईमधलं नॅशनल पार्क...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019
  • संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (बोरीवली)
  • मुंबईतल्या प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. यालाच नॅशनल पार्क असे ही म्हणतात.

मुंबईतल्या प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. यालाच नॅशनल पार्क असे ही म्हणतात.

१०४चौ.की.मी. परिसरात पसरलेले हे जंगल गेल्या ४० वर्षांपासून हौशी पर्यटकांचे मन तृप्त करत आहे. दरवर्षी जवळपास २० लाख पर्यटक येथे भेट देतात. या जंगलात वन्य प्राण्यांचा संचार असल्याने काही भागात पर्यटकांना जाण्यास बंदी आहे. येथे वाघ, सिंह, चित्ता, सांबर, माकड, सर्प यांसारखे वन्य प्राणी अजूनही आढळतात. सरकार तर्फ़े येथे व्याघ्र प्रकल्प राबवला जात आहे, तर या वन्य प्राण्यांना पाहण्यासाठी जंगलसफारीची देखील सोय उपलब्ध आहे.

तसेच येथे निरनिराळ्य़ा प्रकारचे वृक्ष, किटक, पक्षी यांच्या प्रजाती सुध्दा बघायला मिळतात. त्यामुळे पावसाळ्यात निसर्गप्रेमींचे अनेक शिबिरांचे आयोजन येथे केले जाते. येथे एक नदी देखील आहे ज्यात नौकाविहाराची सोय उपलब्ध आहे.

वर्षाचे बाराही महिने ते पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. याच बरोबर लहान मुलांच्या मनोरंजनासाठी सुरु करण्यात आलेली वनराणीही मीनी ट्रेन लहानांबरोबरच मोठ्यांच्याही आवडीची झाली आहे. राष्ट्रपिता महात्मागांधीच्या स्मरणार्थ येथे गांधी टोपीची प्रतीकृतीही उभारण्यात आली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (बोरीवली) येथील जैन धर्मीयांचे प्रार्थनास्थळ प्रसिध्द आहे, जे त्रिमुर्ती या नावाने प्रसिध्द आहे. हे मंदिर ५० वर्षे जुने आहे.

मंदिराच्या प्रवेशद्वारावर जैन धर्मीयांचे पहिले तिर्थंकार आदिनाथ तसेच त्यांचे दोन शिष्य भरतस्वामी व बाहूबली यांच्या ३१फूट उंच मुर्त्या आहेत. कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील बाहूबलीच्या मुर्तीप्रमाणेच या मुर्त्या उभारण्यात आल्या आहेत. सोबतच २४ तीर्थंकारांच्या मुर्त्या देखील पाहण्यासारख्या आहेत. त्या पैकी शेवटचे तिर्थंकार भगवान महावीर यांची काळ्या पाषाणातील मुर्ती अतिशय सुरेख आहे. येथे दर ५ ते ७ वर्षांनी एकदा महाअभिषेक केला जातो. त्यावेळी हेलीकोप्टरने पुष्पवृष्टी केली जाते. यावेळी जवळ्जवळ ३५००० लोक येथे उपस्थित असतात.

अजिंठा,वेरुळसारख्या जगप्रसिध्द लेण्यामुंबईत बघायच्या असतील तर बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट ही द्यायलाच हवी. पहिल्या शतकात बौध्द साधूंनी कोरलेल्या कान्हेरीच्या लेण्या फारच मोहक आहेत. येथील शिल्प आणि त्यावरील कलाकुसर ही वाखाणण्या जोगी आहे.

विदेशी पर्यटकांची येथे येण्याकडे विशेष रूची आहे. भारतातील ऐतिहासीक वास्तूपैकी ही एक वास्तू आहे. अतिशयशांत, स्वच्छ आणि सुंदर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटिपासून १५०० फूट उंचीवर आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारापासून येथे जाण्यासाठी बस व भाड्याच्या सायकल्सची देखील सोय उपलब्ध आहे.आपल्या अशा विविध आकर्षणांमुळे हे ठिकाण पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.

या उद्यानास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील बोरीवली हे स्थानक जवळचे आहे. तेथुन उद्यानाकडे जाण्यासाठी बस व रिक्षा सहज उपलब्ध आहेत.एखादा रविवार किंवा सुट्टिचा दिवस कुटूंबीयांसमवेत घालवायचा असेल तर हे उद्यान अतिशय योग्य निवड ठरेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News