बाप्पासोबत संजय दत्तने पत्नीचा फोटो केला शेअर; दिला महत्त्वाचा संदेश, वाचा काय म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 August 2020
  • गणेश चतुर्थी निमित्त अभिनेता दत्तने ट्विटरद्वारे एक फोटो शेअर केला आहे. 

मुंबई : संजू बाबा सध्या कर्करोगाशी दोन हात करत आहे, बाबाचा कॅन्सर कर्करोग तिसऱ्या टप्प्यावर जाऊन पोहोचला आहे. बाबाची पत्नी मान्यता दत्त संजय दत्त  सोबत सावलीसारखी उभी आहे, अनेक कडू- गोड प्रसंगात तिने बाबांची साथ दिली. गणेश चतुर्थी निमित्त अभिनेता दत्तने ट्विटरद्वारे एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये गणपती बाप्पाच्या बाजूला पती- पत्नी उभे आहेत. त्याखाली एक कॅप्शन लिहल आहे, 'दरवर्षीप्रमाणे यंदा गणपतीचा जल्लोष दिसत नाही, मात्र गणपती बाप्पा विषयी असणारी भावना आणि विश्वास जनतेच्या मनामध्ये कायम आहे. सर्वांना सुखी आणि निरोगी आयुष्य लाभो, गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!  गणपती बाप्पा मोरया' असं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.

बाबाला चाहत्यांनी भरभरुन सुभेच्छा दिल्या आहेत. 'संजय दत्तचे चाहते आणि शुभचिंतकांनी दिलेले प्रेम लाख मोलाचे आहे. संजय दत्तला विविध प्रसंगातून सामोरी जावे लागले, जीवनात अनेक चढ-उतार आले, अशा परिस्थितीत त्यांच्या फॅन्सनी खुप मोठा सपोर्ट केला. कठीन प्रसंगातून बाहेर येण्यासाठी हा सपोर्ट महत्त्वाचा आहे असे मान्यता दत्तने सांगितले, आणि चाहत्यांचे आभार मानले. अनेक दिवसापासून संजय दत्त कुठे आहे? त्यांची ट्रीटमेंट कुठे होणार? असे विविध प्रश्न विचारले जात होते, यावर मान्यता दत्तने उत्तर दिले. संजय दत्त मुंबईमध्ये उपचार घेणार आहेत असे सांगितले.

संजय दत्तच्या अभिनयाची प्रेक्षकांवर कायम छाप आहे. त्यामुळे बाबांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. बाबा लवकर सुखरुप घरी यावे अशा सुभेच्छा चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News