'या' बॉलिवूड अभिनेत्याचे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 18 April 2019

‘प्रस्थानम’, ‘पानीपत’, ‘शमशेरा’ यांसारख्या बिग बजेट चित्रपटांच्या व्यापातून वेळ काढून तो एका ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

सध्या बॉलीवूड कलाकार दिग्दर्शन क्षेत्रात आपलं नशीब आजमावत आहेत. त्यात कंगना राणावतचं नाव आवर्जुन घ्यावं लागेल. कंगनापाठोपाठ संजय दत्तही दिग्दर्शन क्षेत्रात उतरत आहे. ‘प्रस्थानम’, ‘पानीपत’, ‘शमशेरा’ यांसारख्या बिग बजेट चित्रपटांच्या व्यापातून वेळ काढून तो एका ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

२०२१मध्ये संजुबाबाने दिग्दर्शित केलेला ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात संजय मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाच्या कथेवर काम सुरू आहे. संजूबाबाच्या या ऐतिहासिक चित्रपटाबाबत अद्यापही कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आली नाही; पण तो त्याच्या चित्रपटामधून कोणतं ऐतिहासिक कथानक प्रेक्षकांसमोर आणणार हे पाहणं औत्सुक्‍याचं ठरेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News