संजनाने दाखवलेल्या धाडसाचा सगळीकडे बोलबाला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 February 2020

पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश भगवान सांबरे यांनी संजना व तिच्या कुटुंबाची भेट घेऊन तिचा सत्कार केला

विक्रमगड : विहिरीत पडलेल्या चिमुकली जागृतीचा जीव वाचविण्यासाठी संजनाने दाखवलेल्या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शासनाने तिच्या धाडसी कामगिरीचे कौतुक करून सन्मानित करावे, अशी मागणी मंजुळा निचिते यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

तर पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश भगवान सांबरे यांनी संजना व तिच्या कुटुंबाची भेट घेऊन तिचा सत्कार केला.मंगळवारी नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर सायंकाळी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा कऱ्हेतलावली शाळेत ८ वीमध्ये शिकणारी संजना जेठु राव पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली होती. त्या वेळी तेथे तिसरीच्या वर्गात शिकणारी जागृती विष्णू राव कळशी घेऊन आली आणि पाणी भरू लागली.

यावेळी जागृतीचा पाय घसरला व ती विहिरीत पडली.  या वेळी संजनाने प्रसंगावधान दाखवत तिला पाण्यातून बाहेर काढले आणि खांद्यावर घेऊन धावत जवळच असलेल्या सरकारी दवाखान्यात गेली.
 डॉक्‍टर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ तिची तपासणी केली आणि बोटाला झालेल्या जखमेवर मलमपट्टी करून तिला घरी सोडले. डाॅ. चौधरी यांनी देखिल संजनाचे कौतूक केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News