सानिया-नादिया ची विजयी सलामी ; चीनला चारली पराभवाची धूळ 

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Saturday, 18 January 2020

मुंबई : भारतीय कन्या आणि पाकिस्तानची सून असलेल्या सानिया मिर्झा बऱ्याच काळापासून टेनिस पासून दूर  होती. पाकिस्तानी फलंदाज शोएब मलिक ह्याच्याबरोअबर झालेल्या लग्नानंतर सानिया मिर्झा भारतीय टेनिस मधून निवृत्ती घेणार की काय अशी  चर्चा सर्वत्र पसरू लागली होती.परंतु मी टेनिस मधून निवृत्ती घेतली नसून मी भारताकडून खेळत राहणार हे असे तिने स्पष्ट केले होते.

असे नमूद केल्यानंतर सुद्धा ती पूर्णपणे आपल्या खेळापासून अलिप्त होती. लग्नानंतर च्या बऱ्याच कालावधीच्या गॅप नंतर सानियाने भारतीय संघाकडून प्रतिनिधित्व करण्यास पुन्हा एकदा सुरुवात केली आणि सलामीच्या पहिल्याच सामन्यात तिने विजयी सलामीचा झेंडा फडकावला. सानिया मिर्झाने युक्रेनची खेळाडू असलेल्या नादिया कीचनॉक च्या साथीने दुहेरी स्पर्धेत चीनच्या  शुई पेंग आणि शुई झेंग या जोडीचा दारूण पराभव केला आणि सानिया-नादिया या जोडीने चांगलाच धुरळा उडवून दिलाय.

सानिया-नाडियाच्या जोडीने ६-४,६-४ च्या फरकाने तेपण अवघ्या १ तास २१ मिनटात धुव्वा उडवला. सानियाचा हा खेळ २ वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर तेसुद्धा बाळंतपणानंतर केलेली हि कामगिरी उल्लेखनीयच म्हणावी लागेल. सोनियांनी या अगोदरसुद्धा तब्बल ४२ वेळा दुहेरी टेनिस स्पर्धेत आपले विजयी नाव कोरले आहे.

WTA च्या होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मिळवलेल्या यशामुळे सानिया मिर्झाचे भारतीय चाहत्यांकडून सुद्धा अभिनंदनाच वर्षाव होतोय तसेच पाकिस्तानातहि तिच्या यशाचं विवध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. त्यामुळे आगामी काळात सानिया मिर्झाची हि विजयी घोडदौड चालूच राहते का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे    

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News