सॅनिटायझरमुळे होऊ शकते दुर्घटना; अशी घ्या काळजी

चंद्रकांत दडस
Monday, 18 May 2020

सॅनिटायझरमध्ये ज्वलनशील अल्कोहोल असते. ते हातावरील जंतूंचा नाश करतो; मात्र गरम वस्तूशी संपर्क आल्यास ते पेट घेते. सॅनिटायझर वापराताना काळजी न घेतल्याने अनेक दुर्घटना घडल्याचे समोर येत आहे.

कोरोनासारख्या विषाणूशी लढताना हॅण्ड सॅनिटायझरचा वापर अतिशय आवश्‍यक झाला आहे. प्रत्येक घरामध्ये याचा वापर होताना दिसून येत आहे. बाहेरून घरात येताना आपण आपल्या हातांना सॅनिटायझर लावण्याचे विसरत नाही. अनेक लोक आपल्या कारमध्येही सॅनिटायझरची बॉटल ठेवतात. मात्र यात अगदी छोट्याशा चुकीमुळेही मोठी दुर्घटना होऊ शकते.

सॅनिटायझर वापरताना काळजी घेणे अत्यावश्‍यक आहे. सॅनिटायझरमध्ये ज्वलनशील अल्कोहोल असते. ते हातावरील जंतूंचा नाश करतो; मात्र गरम वस्तूशी संपर्क आल्यास ते पेट घेते. सॅनिटायझर वापराताना काळजी न घेतल्याने अनेक दुर्घटना घडल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कारमध्ये सॅनिटायझर वापरताना नेमकी काय काळजी घ्यावी, हे समजून घेणे आवश्‍यक ठरते.

 • . सॅनिटायझरचा वापर करताना पहिले लक्षात ठेवा की आपल्या समोर कोणतीही गरम वस्तू नको.
 • . आगीच्या समोर उभे राहून सॅनिटायझरचा वापर करू नका.
 • . जर आपल्याला कारमध्ये सिगारेट पिण्याची सवय असेल तर त्या वेळी सॅनिटायझरचा वापर करणे टाळा.
 • . सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असल्याने ते थंड ठिकाणी ठेवावे.
 • . गाडीमध्ये 40 अंश सेल्सअसपेक्षा अधिक तापमान नाही ना, याची काळजी घ्या. तापमान जास्त असेल तर एसी सुरू करून तापमान नियंत्रित ठेवा.
 • . कारमध्ये सॅनिटायझर ठेवले असेल, तर ते विंडशील्डच्या समोर नाही ना याची खात्री करून घ्या.
 • . सॅनिटायझरला कारमध्ये अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश थेट सॅनिटायझरच्या बॉटलवर येता कामा नये.
 • . जर तुम्हाला कारमध्ये सॅनिटायझर ठेवायचा असेल, तर एखाद्या बॅगमध्ये तो ठेवावा.
 • . कारमध्ये सतत सॅनिटायझरचा वापर करणेही टाळा. यामुळे हातावरील त्वचा खराब होते.
 • . अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर तुमच्या गाडीतील लेदर खराब करू शकते. तसेच याचा सर्वात मोठा फटका स्टेअरिंग व्हीलला बसू शकतो.
 • . तुम्हाला जर गाडीमध्ये हात धुण्यासाठी काही वापरायचे असेल, तर साबणाचे पाणी वापरण्यास हरकत नाही. ते स्प्रे बॉटलमध्ये भरून तुम्ही कारमध्ये ठेवू शकता.
 • . स्वत:ची गाडी शक्‍यतो इतरांना वापरण्यास देणे टाळा. यामुळे कोरोनाचा फैलाव कमी होण्यास मदत होईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News