सॅमसंग गॅलेक्सी m10 स्मार्टफोन सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये; कंपनीने दिली मोठी ऑफर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 August 2020

पूर्वी सॅमसंग कंपनीने गॅलक्सी m10 स्मार्टफोनची किंमत 9 हजार 999 रुपये ठेवली होती. सध्या खास ऑफरमध्ये गॅलक्सी m10 स्मार्टफोन 8 हजार 399 रूपयांना मिळणार आहे. तब्बल 1 हजार 600 रुपये कमी करण्यात आले.

मुंबई : सॅमसंग कंपनी आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर घेऊन आली आहे. सॅमसंग गॅलक्सी m10 हा मोबाईल आता कमी किंमतीमध्ये ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. पूर्वी सॅमसंग कंपनीने गॅलक्सी m10 स्मार्टफोनची किंमत 9 हजार 999 रुपये ठेवली होती. सध्या खास ऑफरमध्ये गॅलक्सी m10 स्मार्टफोन 8 हजार 399 रूपयांना मिळणार आहे. तब्बल 1 हजार 600 रुपये कमी करण्यात आली. सॅमसंग स्टोअर आणि अमेझॉन, फ्लिपकार्ट अशा ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मोबाईल उपलब्ध आहे. काही दिवसापूर्वी मोबाईलची किंमत कमी केल्याची माहिती कंपनीने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली. स्मार्टफोनमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरोज देण्यात आले. गॅलक्सी m10 स्मार्टफोन काळा, निळा, लाल या तीन कलरमध्ये  ग्राहकांना मिळणार आहे. 

जाणून घ्या फिचर 

4 हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी स्मार्टफोनसोबत मिळणार आहे. 5.7 एचडी आणि इन्फिनिटी व्ही डिस्प्ले असणार आहे. एका मायक्रो मेमरीकार्डद्वारे 512 जीबीपर्यत स्टोरेज वाढवता येणार आहे. 439 क्वॉलकॉम स्नॉपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आले. एकाच वेळी दोन सिम बसण्याची व्यवस्था आहे. फोटो काढण्यासाठी मागे दोन कॉमेरे देण्यात आले. 13 मेगापिक्सल मुख्य आणि 2 मेगापिक्सल सेकंडरी सेन्सर कॅमेरा देण्यात आला. सेल्फी करण्यासाठी 5 मेगापिक्सल कॅमेरा उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये 4जी लाईट, जीपीएस सिस्टम, एफएम रेडिओ आदी फिचर्स देण्यात आले. फोनला जोडण्यासाठी मायक्रो युएसबी पोर्ट, हेडफोनसाठी 3.5 एमएम शॉकेट आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News