'धुरळा' चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस राष्ट्रपतींच्या विरोधात 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 28 December 2019

समीर विद्वांस यांनी ट्विट केले की, "मागच्या वर्षीपासून हे काय नवीन सुरू झालंय?! ‘राष्ट्रपती’ पदक द्यायला सन्मा. राष्ट्रपतींना ३ तास काढता येत नाहीत?! मान्य आहे की आपल्या देशात राष्ट्रपती खूप व्यस्त असतात पण हे ‘राष्ट्रीय’ पुरस्कार आहेत,

मागच्या वर्षीपासुन हा पुरस्कार राष्ट्रपती ऐवजी इतरांकडू प्रदान केला जात आहे. 65 व्या पुरस्काराचे वितरण  माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले होते. राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांच्याकडून पुरस्कार मिळणार नाही हे कलाकारांना समजताच कलाकारांनी नाराजी व्यक्त केली. तर काहींनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.

गेल्या वर्षापासुन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते न मिळता उपराष्ट्रपतींच्या हस्ते मिळत आहे. यामुळे 'धुरळा' चित्रपटाचा दिग्दर्शक समीर विद्वांस संतापला. ट्विटरद्वारे त्याने हे संताप व्यक्त केला. या मानाच्या पुरस्कारासाठी राष्ट्रपतींना तीन तास वेळ काढता येत नाही का? असा सवाल समीर विद्वांसने केला. या वर्षी हा पुरस्कार उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडु यांनी प्रदान केला. 

समीर विद्वांस यांनी ट्विट केले की, "मागच्या वर्षीपासून हे काय नवीन सुरू झालंय?! ‘राष्ट्रपती’ पदक द्यायला सन्मा. राष्ट्रपतींना ३ तास काढता येत नाहीत?! मान्य आहे की आपल्या देशात राष्ट्रपती खूप व्यस्त असतात पण हे ‘राष्ट्रीय’ पुरस्कार आहेत, ह्याआधीचे सर्व काढतच होते की वेळ! त्यांच्या वेळेनुसारच सगळं आयोजीत होतं ना!" अशा शब्दांत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.

मागच्या वर्षीपासून हे काय नवीन सुरू झालंय?! ‘राष्ट्रपती’ पदक द्यायला सन्मा. राष्ट्रपतींना ३ तास काढता येत नाहीत?! मान्य आहे की आपल्या देशात राष्ट्रपती खूप व्यस्त असतात पण हे ‘राष्ट्रीय’ पुरस्कार आहेत, ह्याआधीचे सर्व काढतच होते की वेळ! त्यांच्या वेळेनुसारच सगळं आयोजीत होतं ना!

मागच्या वर्षीपासुन हा पुरस्कार राष्ट्रपती ऐवजी इतरांकडू प्रदान केला जात आहे. 65 व्या पुरस्काराचे वितरण  माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले होते. राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांच्याकडून पुरस्कार मिळणार नाही हे कलाकारांना समजताच कलाकारांनी नाराजी व्यक्त केली. तर काहींनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.

या वर्षीचा 66 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडु त्यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवनात प्रदान करण्यात आला. नाळमधील बालकलाकार श्रीनिवास पोकळेला (चैत्या) सर्वोत्कृष्ट बालकलाकार या पुरस्काराने गौरविण्यात आले.

आयुष्मान खुरानाला 'अंधाधुन', विक्की कौशलला: 'उरी', तर दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ति सुरेशला 'महानटी' यांना या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुरेखा सीकरी यांना 'बधाई हो' या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री या पुरस्काराने गौरवण्यात आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News