कोल्हापूरच्या जुळ्या भावांना सेम टू सेम मार्क 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 30 July 2020

दोन्ही मूलं चांगल्या गुणांनी पास तर झालेच याशिवाय दोघांनाही एकसमान गुण पडल्यान देसाई कुटुंबात दुहेरी आनंदाचं वातावरण आहे.

कोल्हापूरच्या जुळ्या भावांना सेम टू सेम मार्क 

कोल्हापूर - बारावीच्या परिक्षेत दोन जुळ्या बहिणींना सेम टू सेम मिळाल्याचं उदाहरण पाहिलं होतं. तशाच प्रकार कोल्हापूरात घडला आहे. दहावीची परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला. त्यामध्ये कोल्हापूरातील फुलेवाडी परिसरातील जुळ्या भावांना सारखेच मार्क मिळाल्याने दोघांची परिसरात मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रज्वल देसाई आणि प्रणित देसाई अशी जुळ्या भावांची नावं आहेत. 

दोन्ही भावांनी दहावीच्या परीक्षेत ५०० पैकी ४४५ गुण मिळविले आहेत. त्यामुळे दोघांनाही ८९ टक्के मार्क मिळाले आहेत. दोघांनाही समान गुण मिळाल्याने कुटुंब सुध्दा आश्र्चर्यचकित झाले 

प्रज्वल आणि प्रणित ही भावंडं फुलेवाडीतील श्री गुरुदेव विद्यानिकेतन शाळेत शिक्षण घेत होते. दोघांनाही आत्तापर्यंत समान गुण कधीचं मिळाले नव्हते. परंतु दहावीत हा योग जुळून आला आहे. तसेच दोघांचा परीक्षेत आसन क्रमांक वेगवेगळ्या इमारतीत होता. दोन्ही मूलं चांगल्या गुणांनी पास तर झालेच याशिवाय दोघांनाही एकसमान गुण पडल्यान देसाई कुटुंबात दुहेरी आनंदाचं वातावरण आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News