सीबीएसई १२ वीच्या परीक्षेत जुळ्या बहिणींना गुणही सारखेच 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 15 July 2020

सीबीएसई १२ वीच्या परीक्षेत जुळ्या बहिणींना गुणही सारखेच

सीबीएसई १२ वीच्या परीक्षेत जुळ्या बहिणींना गुणही सारखेच

सीबीएसई बोर्डाकडून बारावीचा निकाल नुकताच जाहीर केला, अनेक विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवल्याचे निकालातून सिध्द झाले आहे. विशेष म्हणजे यंदाच्या सीबीएसईच्या निकालात नोएडामधील जुळ्या बहिणीनी सारखे गुण मिळवल्याने त्यांची सर्वत्र चर्चा सुरू आहे. दोघींनीही ९८.५ टक्के गुण मिळवले आहेत. 

मानसी आणि मान्या अशी जुळ्या बहिणींची नावे आहेत. या दोघी ग्रेटर नोएडातील एस्टर पब्लिक स्कूल या महाविद्यालयात शिकत होत्या. विशेष म्हणजे मानसी आणि मान्या या दोघींनी इंग्रजी आणि कंम्पूटर सायन्स या विषयात ९८-९८ गुण मिळविले आहेत. त्याचपध्दतीने फिजिक्स, केमिस्ट्री आणि फिजिकल एज्युकेशन या विषयांमध्ये ९५-९५ असे गुण मिळविले आहेत. त्यामुळे या दोघींची चर्चा देशभर सुरू आहे. 

३, मार्च २००३ मानसी आणि मान्याचा जन्म झाला. या दोन्हीच्या जन्मामध्ये फक्त ९ मिनिटाचं अंतर आहे. जन्माचा फरक वगळता सर्वचं बाबी सारख्या आहेत. आता या दोघींनाही अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करायचे आहे. त्यासाठी मानसी आणि मान्या जेईई परीक्षेची तयारी करीत आहेत. 

"बोर्डाच्या परीक्षेत सारख्या दिसणा-या बहिणींनाही सारखेच मार्क मिळाल्याचे पेपर मध्ये वाचले होते. पण तो योगायोग असेल असा मी विचार केला होता. पण आता आम्ही दोघींनाही एकसारखेच गुण मिळाल्याने आमचा विश्वास बसत नाही अशी प्रतिक्रिया मान्याने व्यक्त केली. नेहमी माझ्यात आणि माझ्या बहिणीत स्पर्धा असते. विशेष म्हणजे यापुर्वी आम्ही कधीच असे गुण मिळविलेले नाहीत" असंही मान्याने सांगितले. 

"आम्ही दोघी दिसायला सारख्याच आहे, फक्त दोघींची नावं वेगळी आहेत. दोघींचाही अभ्यास चांगला असल्याने मार्क चांगले मिळतील असा विश्वास दोघींनाही होता. परंतु सारखेच गुण मिळतील असं दोघींनाही वाटलं नव्हतं" अशी प्रतिक्रिया मानसीने दिली

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News