रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या नाटकावर नेटकऱ्यांच्या उड्या 

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Saturday, 18 January 2020
  • स्त्रीशिक्षण,लैंगिक स्वातंत्र्यं,अभिव्यक्ती स्वातंत्र्य इत्यादी विषयांवर त्यांनी जाहीरपणे आपली भूमिका व्यक्त केली.
  • १५ जुलै १९२७ साली समाजस्वास्थ्य नावाचे मासिक प्रकाशित केले.

मुंबई: जवळपास १०० वर्षांपूर्वी ज्या विषयावर खासगीमध्ये चर्चा करणेसुद्धा अवघड वाटायचे त्याच कुटुंबनियोजनाच्या विषयावर अगदी निर्भीडपणे आपले मत मांडणारे रघुनाथ धोंडो कर्वे यांच्यावर आधारित असे समाजस्वास्थ्य  नाटक हे नुकतेच डिजिटल व्यासपीठावर प्रदर्शित करण्यात आले आहे

अगदी अल्पावधीतच ह्या नाटकाला युट्युबवर तब्बल ११००० पेक्षा जास्त प्रेक्षकांनी दाद दिली आहे तसेच प्रचंड प्रमाणावर ह्या नाटकाची चर्चा होऊ लागली आहे .  

स्त्रीशिक्षण, लैंगिक स्वातंत्र्यं,अभिव्यक्ती स्वातंत्र्य इत्यादी विषयांवर त्यांनी जाहीरपणे आपली भूमिका व्यक्त केली. १५ जुलै १९२७ साली समाजस्वास्थ्य नावाचे मासिक प्रकाशित केले.

र. धो. कर्वे यांच्या कार्याचा आढावा घेऊन नाट्यघर या नाट्यनिर्मिती कंपनीने समाजस्वास्थ्य हे नाटक नुकतेच युटूबवर प्रदर्शित केले त्यामुळे तरुणाचा ह्या नाटकाला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News