वाचनाच्या गोडीसाठी सलूनमालकाचा अनोखा उपक्रम

प्रथमेश गडकरी
Friday, 6 March 2020

तरुण पिढीला वाचनाची गोडी लागावी यासाठी कांजूरमार्ग येथील एका सलूनमध्ये चक्क वाचनालय उघडण्यात आले आहे

मुंबई : तरुण पिढीला वाचनाची गोडी लागावी यासाठी कांजूरमार्ग येथील एका सलूनमध्ये चक्क वाचनालय उघडण्यात आले आहे. रवींद्र बिरारी या सलूनचे मालक. त्यांच्या सलूनमध्ये येणाऱ्या ग्राहकांना वाचण्यासाठी त्यांनी ७० पेक्षा जास्त पुस्तके ठेवली आहेत.

त्यामुळे त्यांच्या सलूनमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या हातात मोबाईल नव्हे तर पुस्तक दिसते. शिवाय, सलूनच्या आत येताय तर मोबाईल खिशात ठेवा आणि जरा पुस्तक वाचा, असे ठणकावून बिरारी ग्राहकांना सांगतात. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News