सलमान करणार 'मुळशी पॅटर्न'चा रिमेक; गॅंगस्टरच्या भूमिकेत दिसणार 'हा' अभिनेता

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 February 2020

मुंबई :  एखाद्या चित्रपटाचा रिमेक हा सध्या बॉलीवूडमध्ये हिट चित्रपटाचा फॉर्म्युला  मानला जातो.त्यामुळेच बॉलीवूडमध्ये सध्या रिमेक चित्रपटांची चांगलीच चलती  सुरु आहे. अनेक भाषांमध्ये हिट ठरलेल्या चित्रपटांना बॉलीवूडमध्ये रिमेक केलं जातं. त्यामध्ये इंग्लिश, तामिळ, तेलगू, मराठी इ. भाषेतील चित्रपटांचा समावेश होतो. 

मुंबई :  एखाद्या चित्रपटाचा रिमेक हा सध्या बॉलीवूडमध्ये हिट चित्रपटाचा फॉर्म्युला  मानला जातो.त्यामुळेच बॉलीवूडमध्ये सध्या रिमेक चित्रपटांची चांगलीच चलती  सुरु आहे. अनेक भाषांमध्ये हिट ठरलेल्या चित्रपटांना बॉलीवूडमध्ये रिमेक केलं जातं. त्यामध्ये इंग्लिश, तामिळ, तेलगू, मराठी इ. भाषेतील चित्रपटांचा समावेश होतो. 

मराठी चित्रपटाला सुगीचे दिवस आले असल्याने सध्या मराठीतले काही चित्रपट बॉलीवूडमध्ये रिमेक केले जात आहेत. त्यामध्ये सैराट, पोस्टर बॉईज यांसारख्या चित्रपटांचा समावेश होतो.आणि या चित्रपटांना प्रेक्षकांकडून मराठीसारखीच लोकप्रियता मिळाली. काही दिवसांपूर्वीच 'मुळशी पॅटर्न' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रवीण तरडे यांचं दिग्दर्शन असणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तसेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. आता याच चित्रपटाचं रिमेक बॉलीवूडमध्ये होणार असल्याचे सांगितले जात आहे. आणि हा रिमेक दुसरं तिसरं कोणी नसून दबंग खान करणार आहे. 

सलमान खान हा नेहमीच नवोदित कलाकारांना चित्रपटांमध्ये संधी देत असतो. मागच्या वर्षीच 'लव्ह यात्री' या चित्रपटामधून सलमानने आपला मेहुणा म्हणजेच आयुष्य शर्मा याला लॉन्च केलं होत. परंतु हा चित्रपट पुरता फ्लॉप झाला. त्यानंतर आयुष्य शर्मासोबत सलमानही काही प्रमाणात ट्रोल झाला होता. किंबहुना सलमान पुन्हा आयुषला लॉन्च करणार नाही अशा चर्चाही रंगू लागल्या होत्या. परंतु आता या सर्व चर्चांना सलमानने पूर्णविराम लावला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, २०१८ साली प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला 'मुळशी पॅटर्न' हा चित्रपट रिलीझ झाला होता. आणि आता याच चित्रपटाचा रिमेक सलमान खान करणार असून यामध्ये त्याने आपला मेहुणा आयुष्य शर्माला एक महत्वपूर्ण भूमिका सोपविली आहे. या चित्रपटात सलमान एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून आयुष्य शर्मा एका गॅंगस्टरची भूमिका साकारणार आहे. आपल्या चित्रपटाचा रिमेक स्वतः सलमान खान करणार असल्याने प्रवीण तरडे आनंदात आहे. परंतु चित्रपटाचे नाव अद्याप समोर आले नाही    
  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News