टायगर क्वीन ची बहीण इसाबेल कैफ लवकरच बॉलीवूड मध्ये पदार्पण करणार सई मांजरेकर नंतर सलमान खान करतोय तिला लाँच

स्वप्नील नावडकर
Monday, 30 December 2019

मुंबई : येत्या नवीन वर्षात अनेक चेहरे बॉलीवूडमध्ये  पदार्पण करण्याच्या तयारीत आहेत. नवीन चेहरे देखील आपले नशीब अजमावण्यासाठी सज्ज झाले आहेत. 
यामध्ये चमेली गर्ल कतरीना कैफ ची धाकटी बहीण इसाबेल कैफ सुद्धा अपवाद नाहीये.

मुंबई : येत्या नवीन वर्षात अनेक चेहरे बॉलीवूडमध्ये  पदार्पण करण्याच्या तयारीत आहेत. नवीन चेहरे देखील आपले नशीब अजमावण्यासाठी सज्ज झाले आहेत. 
यामध्ये चमेली गर्ल कतरीना कैफ ची धाकटी बहीण इसाबेल कैफ सुद्धा अपवाद नाहीये.

इसाबेल कैफ हि पुढच्या वर्षी क्वाथ या चित्रपटाद्वारे आपले नशीब अजमवणार आहे तेसुद्धा सलमान खान याची निर्मिती असलेल्या क्वाथ चित्रपटाद्वारे. 
सलमान खान चा मेहुणा आयुष शर्मा याच्यासोबत आर्मी बेस असलेला क्वाथ या चित्रपटातून  प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटासाठी इसाबेल आणि आयुष शर्मा हे दोघेही प्रचंड मेहनत घेताना दिसून येत आहेत.

 
आयुष  तर टायगर श्रॉफ चा ट्रेनर असलेल्या विक्रम स्वेन कडून फिटनेस चे धडे गिरवताना दिसतोय. आर्मी ऑफिसर च्या लुक साठी तर तो दिवसातून ३ तास व्यायाम करताना दिसतोय. आयुष शर्मानी याआधी लव रात्री या चित्रपटातून पदार्पण केले होते मात्र त्याला हवे तसे यश संपादित करता आले नाही. 

इसाबेल कैफ याआधी  "टाइम टू  डान्स" या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार होती मात्र आता "क्वाथ" या चित्रपटुन ती बॉलीवूड मध्ये पदार्पण करणार हे असे स्वतःच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सांगितले आहे त्यामुळे "क्वाथ" मधून ती डेब्यू करणार हे मात्र नक्की.  

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News