बापाच्या विसर्जन मिरवणुकीत सलमानने लगावले ठुमके, पाहा व्हिडीओ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 4 September 2019

दोन वर्षांपासून खान कुटुंबाने त्यांच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा मुलगी अर्पिता खान शर्मा हिच्या घरी केली आहे. बाप्पा दिड दिवसाचा असल्यामुळे मंगळवारी गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत बॉलिवूडच्या भाईजानचा जबरदस्त डान्स पाहायला मिळाला.

आपल्या सर्वांच्या आवडीचा सण म्हणजेच गणेशोत्सव. अगदी आतुरतेने आपण गणेशोत्सवाची वाट पाहत असतो. तेवढ्याच आतुरतेने अनेक बॉलिवूडकरही बाप्पाची वाट पाहत असतात आणि मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. त्यात सलमान खान देखील मोठ्या थाटात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करतो. त्याच्या घरी दिड दिवस बाप्पाची भक्ती भावाने पूजा केली जाते. 

चित्रपटसृष्टीतील सर्वच सेलिब्रिटी बाप्पाच्या दर्शनासाठी गॅलेक्सी अपार्टमेंट येथे जात असतात. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून खान कुटुंबाने त्यांच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा मुलगी अर्पिता खान शर्मा हिच्या घरी केली आहे. बाप्पा दिड दिवसाचा असल्यामुळे मंगळवारी गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत बॉलिवूडच्या भाईजानचा जबरदस्त डान्स पाहायला मिळाला.

ढोल-ताशांच्या गजरातील सलमानच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. सलमानसोबत अभिनेत्री स्वरा भास्कर व डेझी शाह देखील थिरकताना दिसतात, तर दुसऱ्या व्हीडीओत भाची अग्निहोत्रीसह सलमान डान्स करताना दिसत आहे.       

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News