शाहरुख खानच्या डुप्लिकेटची मदत करण्यासाठी सलमान खान आला पुढे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 29 April 2020

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान केवळ आपल्या चित्रपटांसाठीच नाही तर लोकांना मदत करण्यासाठीही ओळखला जातो. कोरोना विषाणूमुळे बॉलिवूडमधील सर्व कामकाज एका महिन्यापेक्षा अधिक काळ रखडली आहे.

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान केवळ आपल्या चित्रपटांसाठीच नाही तर लोकांना मदत करण्यासाठीही ओळखला जातो. कोरोना विषाणूमुळे बॉलिवूडमधील सर्व कामकाज एका महिन्यापेक्षा अधिक काळ रखडली आहे. अशा परिस्थितीत सलमान खानने फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले. याशिवाय सलमान बॉलीवूड कलाकारांच्या डुप्लिकेटलाही मदत करत आहे. शाहरुख खान, आमिर खान, सनी देओल, नाना पाटेकर या कलाकारांसारख्या दिसणाऱ्या व्यक्तींव्यतिरिक्त सलमानने सागर पांडेसारख्या कलाकारांना मदत केली आहे.

अलीकडेच शाहरुख खानसारखा दिसणारा आणि ज्युनिअर शाहरुख खान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता राजू रहिकवारने सलमान खानने त्याला मदत केल्याचं सांगितलं आहे. तो म्हणाला की कोरोना व्हायरसमुळे तो खूप कठीण काळातून जात आहे. लंडन आणि अमेरिकेत त्यांचे कार्यक्रम होणार होते जे रद्द झाले होते. राजूला मदत करायला कोणी पुढे आले नाही. राजूकडील पैसे संपले होते आणि त्यानंतर त्याला मेसेज आला की सलमानची संस्था बीइंग ह्युमन या संस्थेने त्यांच्या खात्यात 3 हजार रुपये ट्रान्सफर केले आहेत.

राजू गेल्या 20 वर्षांपासून वेगवेगळ्या कार्यक्रमात शाहरुख खानची मिमिक्री करत आहे. बॉलिवूडमधील मोठे स्टार आणि मिमिक्रीसारखे इतर कलाकारही या वेळी कठीण काळातून जात आहेत, असे त्यांनी सांगितले. सलमानने त्याच्यासारखे दिसणाऱ्या सागर पांडेला मदत केली आहे. त्याने सांगितले की सलमानने बॉलिवूडमधील स्टार्सच्या डुप्लिकेट्सना खूप मदत केली आहे. सलमानने दिलेल्या मदतीने तो अन्य ज्युनिअर कलाकारांनाही मदत करेल असेही सागर म्हणाले.

यापूर्वी सलमान खानने फेडरेशनने पाठविलेल्या 16000 मजुरांच्या बँक खात्यात एकूण 4 कोटी 80 लाख रुपये ट्रान्सफर केले आहेत. याशिवाय मे महिन्यात 19000 मजुरांच्या खात्यात 5 कोटी 70 लाख रुपये हस्तांतर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. याव्यतिरिक्त, कोरोनामुळे काम गेल्यामुळे अनेकजण अडचणीत आले आहेत. त्यांना एक वेळेचे जेवण मिळणे  देखील कठीण झाले आहे. यासाठी भुकेल्या कामगारांसाठी त्याने ट्रकमध्ये अन्न पाठवले. आपल्या चाहत्यांसाठी सलमान नेहमीच पुढाकार घेताना दिसतो. तो विविध पद्धतीने गरिबांची मदत करत असतो. त्याच्या संस्थेच्या माध्यमातून हा मदतीचा ओघ सुरु असतो. याशिवाय स्वतः देखील या कामात अग्रेसर असल्याचं समोर आले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News