सलमानने अखेर सोडले मौन; सुशांतसिंह बाबत दिली प्रतिक्रीया... पाहा काय म्हणाले

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 June 2020
  • सोशल मीडियावर उलट- सुटल चर्चा

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीचा मुद्दा चर्चिला जात आहे. समाज माध्यमांवर करण जोहर, एकता कपूर, आलिया भटसह सलमान खानलाही ट्रोल केले जात आहे. आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया न देणाऱ्या सलमानने आता आपल्या ट्विटमध्ये, सुशांतच्या चाहत्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे आपल्या चाहत्यांना आवाहन केले आहे.

सुशांतच्या मृत्यूसाठी बॉलीवूडमधील घराणेशाहीच जबाबदार आहे, असे आरोप इंडस्ट्रीतील काही मंडळींनी केले आहेत. कंगना रानौतने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत हिंदी चित्रपटसृष्टीतील नेपोटिझमवर हल्ला चढविला आहे. दरम्यान, याबाबत प्रथमच आपले मौन सोडत सलमान खान याने आपल्या ट्विटमध्ये आपल्या चाहत्यांना आवाहन करताना म्हटले आहे, की हा प्रसंग खूप कठीण आहे. आणि अशा कठीण प्रसंगांत सुशांतच्या चाहत्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहा. त्यांच्या भाषेकडे दुर्लक्ष करा. आज सुशांतच्या चाहत्यांना आणि कुटुंबीयांना साथ देण्याची आवश्‍यकता आहे. त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहा. सलमान खानने अशा प्रकारे ट्विट केल्यामुळे पुन्हा त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे, तर सलमानच्या चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News