तत्सम डिझाईन वापरून बूट विक्री

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 February 2020

कुर्ल्यातील किशोर फुटवेअर, सचिन फुटवेअर, सुफियाना फुटवेअर, साजीद फुटवेअर, योगेश फुटवेअर आणि सुनील फुटवेअर या दुकानांवर छापा टाकून पोलिसांनी नामांकित कंपन्यांचे बनावट बूट-सन्डल्स जप्त केले आहेत.

चेंबूर : स्वस्तात ब्रॅन्डेड बूट सॅन्डल घेताय, तर सावधान! बूट आणि सॅन्डलच्या बड्या कंपन्यांचे लोगो लावून ते ब्रन्डेड असल्याचे भासवून विक्री करणारी टोळी मुंबई पोलिसांनी पकडली आहे. कुर्ला येथून सहा दुकानदारांसह मशीद बंदर येथील दोन वितरकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बिनोद सिंग, योगेश जैस्वाल, अल्तमश शेख, स्वप्निल गुंथळे, किशोर अहिरे, राजेश गडा, सचिन कानडे, साजिद शेख अशी आरोपींची नावे आहेत.

कुर्ला येथे काही दुकानदार नामांकित कंपन्यांचे बनावट बूट सॅन्डल्स विकत असल्याची तक्रार कंपनीच्या प्रतिनिधींनी पोलिसांकडे केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ५ ने कुर्ला परिसरात धाडी टाकून सहा दुकानदारांना सोमवारी अटक केली. त्यांच्याकडून २३ लाख ९७ हजार रुपये किमतीचे बनावट पुमासह इतर कंपन्यांचे बूट-सॅन्डल जप्त करण्यात आले. त्यांच्या चौकशीत मशिद बंदमधील दोन वितरकांची नावे पुढे आली. त्यानुसार मशिद बंदर येथील 

दोन वितरकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १० लाख रुपयांचे बनावट बूट, सॅन्डल्स सापडले आहेत. या बूट, सॅन्डल्सवर नामांकित कंपन्यांच्या लोगोशी साधर्म्य असलेले लोगो वापरण्यात आले होते. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत होती. मूळ किमतीपेक्षा हे बूट स्वस्त मिळत असल्याची शक्‍यता असल्याने ग्राहकही बळी पडत असतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. हे लोगो कोठून बनवण्यात आले होते, हे लवकरच उघड होण्याची शक्‍यता आहे. कारवाईमुळे नामाकिंत कंपन्यांचे लोगो वापरून बनावट बूट विकणाऱ्या दुकानदारांना जरब बसेल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

#या दुकानांवर छापा 
कुर्ल्यातील किशोर फुटवेअर, सचिन फुटवेअर, सुफियाना फुटवेअर, साजीद फुटवेअर, योगेश फुटवेअर आणि सुनील फुटवेअर या दुकानांवर छापा टाकून पोलिसांनी नामांकित कंपन्यांचे बनावट बूट-सन्डल्स जप्त केले आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News