बायकोला खूश ठेवण्यासाठी, धोनी हे सिक्रेट वापरतो

यिनबझ टीम
Wednesday, 27 November 2019

क्रिकेटच्या मैदानावर भले ही मी ‘कॅप्टन कूल’ म्हणून वावरत असलो तरी महेंद्र सिंह धोनी म्हणतो की घरातील मैदानातला कॅप्टन कूल साक्षीच असते, घरातील सगळे सामने त्याची पत्नी साक्षी जिंकत असते, मी कधी घरातल्या गोष्टींमध्ये लक्ष घालत नाही, असेही तो म्हणाला.

धोनी म्हणला की, 'मला माहित आहे, माझी पत्नी खूष असेल तरच मी खूष असू शकतो. मी एक आदर्श पती बनण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. मी माझ्या बायकोचा विचार करत असतो. मला माहित आहे की ती सुखी असली तरच मी आनंदी राहू शकतो. तसेही मी जेव्हा तिच्या प्रत्येक गोष्टीला होकार देईन, तेव्हाच ती खूष राहिल, असेही धोनी  एका कार्यक्रमात बोलताना म्हणाला.

धोनी म्हणतो की वयाप्रमाणेच नातीही घट्ट होतात. लग्नाचा अर्थ 50 वर्षानंतर समजतो. एकदा तुम्ही 55 वर्षाचे झालात की आपल्या प्रेमाची खरी वेळ आल्याचे आपल्याला समजून जाते. त्यावेळेला आपले सगळे वेळापत्रक बदलून जाते. धोनी म्हणतो की आता माझ्याकडे खूप वेळ आहे, आता आम्ही एकत्र राहाणार.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News